CoronaVirus News in Pune: बापरे! इंदापूरात एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 10:15 AM2020-06-16T10:15:55+5:302020-06-16T10:34:57+5:30

CoronaVirus Marathi News Updates in Pune: एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

CoronaVirus Latest Marathi News in Pune 9 corona positive in indapur | CoronaVirus News in Pune: बापरे! इंदापूरात एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाबाधित

CoronaVirus News in Pune: बापरे! इंदापूरात एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाबाधित

Next

इंदापूर - इंदापूर शहरात १३ जून रोजी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने जोरदार हालचाली करून १४ जून रोजी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण चाळीस जणांचे नमुने ( स्वॅब ) घेवून तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. त्यातील एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे.  

१६ जून रोजी रात्री उशीरा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यातील एकूण नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  यामध्ये पुरूष वय ०१, ०९, ३६, ४० असे चार पुरुष आणि महिला वय ०४, ३२, ४८, ५३, ६५ अशा पाच महिलांचा समावेश आहे असे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले. १३ जून रोजी कोरोनाबाधित आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एक वकिलांच्या पत्नी आहेत तर दुसरा रुग्ण मुख्य बाजार पेठेतील सहकारी बँकेतील कर्मचारी व नगरसेविकेचे पती आहेत. 

नव्याने नऊ कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण हे एकाच कुटुंबातील आहेत असे तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. इंदापूर शहरात असणाऱ्या अनेक शासकीय, निमशासकीय, सहकारी व खाजगी बँकेत व कार्यालयात काम करणारे कर्मचारी कोरोनाचा रेड झोन मधून प्रवास करून कामावर येतात. त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून, नगरपरिषदेने सर्व संस्थांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहे अशी माहिती मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी दिली. 

नागरिकांच्या अज्ञानासमोर प्रशासन हतबल!

इंदापूर शहरात नगरपरिषद, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांनी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टनसींग ठेवण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र आज मंगळवारी शहरात एकूण नऊ कोरोना बाधित आढळले आहेत. तरी सकाळी टेंभूर्णी नाका येथील इंगोले मैदान येथे भरलेल्या बाजारात नागरिकांनी कसल्याही प्रकारचे फिजिकल डिस्टंन्सिंग पाळले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या अज्ञानासमोर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. 

महत्त्वाच्या बातम्या

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

Web Title: CoronaVirus Latest Marathi News in Pune 9 corona positive in indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.