coronavirus: बिबट्यांचेही होणार संसर्गापासून संरक्षण, जुन्नरच्या माणिकडोह निवारा केंद्रात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:52 AM2020-05-11T00:52:57+5:302020-05-11T00:55:38+5:30

एखादा बिबट्या आजारी असल्यास त्यासाठी क्वारंटाइन कक्षही उभारण्यात आले आहेत. या सोबतच केंद्रीय प्राणीसंग्रहालय समितीने केलेल्या सूचनेनुसार या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्यावरच आत सोडण्यात येत आहे.

coronavirus: Leopards to be protected from infection, Junnar's Manikdoh Shelter | coronavirus: बिबट्यांचेही होणार संसर्गापासून संरक्षण, जुन्नरच्या माणिकडोह निवारा केंद्रात उपाययोजना

coronavirus: बिबट्यांचेही होणार संसर्गापासून संरक्षण, जुन्नरच्या माणिकडोह निवारा केंद्रात उपाययोजना

Next

- निनाद देशमुख 
पुणे : मानवापासून प्राण्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी जुन्नरच्या माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात विशेष खबरारी घेतली जात आहे. बिबट्यांचे दिवसांतून तीनदा स्क्रीनिंग करण्यात येत आहे.

एखादा बिबट्या आजारी असल्यास त्यासाठी क्वारंटाइन कक्षही उभारण्यात आले आहेत. या सोबतच केंद्रीय प्राणीसंग्रहालय समितीने केलेल्या सूचनेनुसार या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्यावरच आत सोडण्यात येत आहे.
अमेरिकेत वाघाला संसर्ग झाल्याने भारतातही पशुपक्षांना कोरोना होऊ नये, यासाठी सेंटर झू कमिटी आणि केंद्रीय वनविभातर्फे विविध सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील ३३ बिबट्यांची रोज तपासणी करण्यात येत आहे.

प्रत्येक कर्मचाºयाचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. या केंद्रात वाहणे आणण्यास बंदी आहे. कर्मचाऱ्यांचे कपडे सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्यात आल्यावर मास्क आणि गमबुट आणि मिनी पीपीई किट त्यांना दिली जात आहे. बिबट्यांच्या पिंजºयांची रोज स्वच्छता करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. यात बिबट्याच्या रोजच्या हालचाली, ताप, त्यांच्या स्वभावातील बदल तसेच कोरोनाची लक्षणे टिपले जात आहेत. बिबट्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या आहारातून त्यांना व्हिटॅमिन दिले जात आहे.

स्वॅब तपासणीसाठी निवारा केंद्रात छोटी लॅब
निवारा केंद्रातील बिबट्यांमध्ये कोरोनासदृश लक्षण आढळल्यात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी छोटी लॅब उभारण्यात आली आहे. बिबट्यांची प्राथमिक तपासणी या ठिकाणी करून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन ते पुढील तपासणीसाठी येथून पाठविण्यात येणार आहे.
पाच क्वारंटाइन कक्षांची उभारणी
येथील बिबट्यांमध्ये सध्यातरी कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. मात्र, एखादा बिबट्या आजारी पडल्यास त्याच संसर्ग इतर बिबट्यांना होऊ नये यासाठी या ठिकाणी ५ क्वारंटाइन पिंजरेही तयार करण्यात आले आहे. या पिंजºयात त्यांना ठेवण्यात येणार आहे.

मानवापासून प्राण्यांना संसर्ग होऊ शकतो. यामुळे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात विशेष काळजी घेतली जात आहे. कर्मचाºयांचे रोज स्क्रीनिंग होत आहे. बिबट्यांचीही दिवसांतून तीन वेळा तपासणी केली जात आहे. - जयरामे गौडा, उपवन संरक्षक

बिबट्यांच्या संरक्षणासाठी केंद्रात कर्मचाºयांशिवाय
इतरांना येण्यासाठी बंदी आहे. बिबट्यांसाठी येणाºया अन्नाचीही तपासणी केली जात आहे. तातडीने उपचार व्हावे यासाठी लॅब उभारण्यात आली आहे. असलेल्या बिबट्यांची तब्येत चांगली आहे. -अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर

Web Title: coronavirus: Leopards to be protected from infection, Junnar's Manikdoh Shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.