coronavirus : पुण्यातील लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:41 PM2020-04-08T16:41:49+5:302020-04-08T16:42:23+5:30
पुण्यात दरराेज काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने 14 एप्रिलनंतरही पुण्यात लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
पुणे : राष्ट्रीय पातळीवर 62 जिल्ह्यांमध्ये 15 पेक्षा जास्त काेराेनाचे रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्याचा समावेश हाेताे. त्यामुळे 14 तारखेनंतर देखील पुणे जिल्ह्यासाठी लाॅकडाऊन पुढे सुरु राहील अशी शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.
काेराेनाच्या पार्श्वभूमिवर लाेकमतने आयुक्तांशी संवाद साधला त्यावेळी ते बाेलत हाेते. गायकवाड म्हणाले, पुण्यातली काेराेनाबाधितांची संख्या पाहता 14 तारखेनंतर पुण्यात लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीच्याबाबतीत सरकार वेगळा निर्णय घेऊ शकते. परंतु लाॅकडाऊनबाबत सरकार जाे काही निर्णय घेईल ताे नागरिकांच्या हितासाठी असून त्याची अंमलबजावणी पुणे महानगरपालिका करेल.
शहरातील विविध भाग सील करण्यात आले आहेत, त्याबाबत बाेलताना गायकवाड म्हणाले, दाेन दिवसांपूर्वी काही भाग सील करण्याचा निर्णय घेतला. शहरातील काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जीपीएसच्या माध्यमातून माॅनिटर करत हाेताे. त्यातून असे लक्षात आले की काेंढवा भागात जवळजवळ रहिवासास असणारे अनेक रुग्ण आढळत आहेत. त्याचबराेबर सात किलाेमीटरच्या परिसरात 10 रुग्ण चाेवीस तासात आढळल्याने ताे भाग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा भाग गुलटेकडी ते आरटीओ दरम्यान 37 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामुळे हा भाग देखील सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेठांच्या भागामध्ये अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळून आले. त्यामुळे हे फिरणे बंद करणे हा उद्देश हाेता. आता या भागांमध्ये घराेघरी जाऊन नागरिकांचा सर्वे करत आहेत. पाॅझिटिव्ह रिपाेर्ट यायच्या आधीच मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या. अनेकांना लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत.