CoronaVirus News : पुणे महापालिकेची ऑक्सिजन यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:08 PM2020-09-06T12:08:49+5:302020-09-06T12:11:49+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: ऑक्सिजन पुरवठ्यासाठी चार वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने जुन्याच पुरवठादारावर विसंबून राहावे लागत आहेत.
राजानंद मोरे
पुणे - ऑक्सिजनची मागणी वाढत चालल्याने महापालिकेच्या नायडू, दळवी रुग्णालयासह अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा वेळेत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी चार वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने जुन्याच पुरवठादारावर विसंबून राहावे लागत आहेत. तसेच त्याच्याकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने इतर पुरवठादारांकडे हात पसरावे लागत आहेत. तरीही रोजची गरज भागविताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन यंत्रणाच सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.
पुण्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापुर्वी नायडूसह कमला नेहरू व अन्य रुग्णालयांला ऑक्सिजनची गरज अत्यंत नगण्य होती. त्यामुळे एकाच पुरवठादाराकडून आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलेंडर भरून घेतले जात होते. पण मार्च महिन्यापासून नायडू रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण दाखल होऊ लागल्यानंतर ऑक्सिजनची गरज वाढत गेली. तिथे आयसीयु तसेच हाय फ्लो ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या जवळपास १५५ बेड असून त्यापैकी जवळपास ८० ऑक्सिजन बेड आहेत. तसेच सात व्हेंटिलेटर बेड असल्याने या रुग्णांना ऑक्सिजन जास्त लागतो. त्यामुळे दररोज सुमारे २०० जम्बो सिलेंडरची गरज भासत आहे. दळवी रुग्णालयामध्ये १० व्हेंटिलेटर व ३० ऑक्सिजनबेड आहेत. तिथे लिक्विड ऑक्सिजनचे चार टँक असले तरी वेळेत भरले जात नाहीत.
CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/3VE71ErlBw#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2020
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून इतरही पर्याय शोधण्याची विनंती महापालिकेला केली आहे. त्यामुळे जम्बो सिलेंडरवर अवलंबून राहावे लागते. बोपोडीमध्ये पाच ऑक्सिजन बेड असून तिथे तुलनेत कमी सिलेंडर लागतात. कमला नेहरू रुग्णालयामध्येही खुप कमी ऑक्सिजन लागतो. प्रामुख्याने नायडू व दळवी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत चालल्याने महापालिकेने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी महिनाभरापुर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली. पण तीन वेळा मुदतवाढ देऊनही एकाही पुरवठादाराने निविदा भरली नाही. त्यामुळे सध्या जुन्याच पुरवठादारावर विसंबून राहावे लागत आहे. त्याच्यावरही ऑक्सिजन पुरवठ्याचा ताण असल्याने तसेच पालिकेला पुरवठ्याचे बंधनही नसल्याने अपेक्षित पुरवठा होत नाही. परिणामी, अन्य पुरवठादारांकडे हात पसरावे लागत आहेत. परिणामी, रोजची ऑक्सिजन सिलेंडरची गरज भागविताना नाकीनऊ येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पुरवठादारांना रोजची मागणी पुर्ण करणे शक्य होईलच असे नाही, त्यामुळे त्यांच्याकडून निविदा भरल्या जात नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पालिका रुग्णालयातील ऑक्सिजन बेड
नायडू रुग्णालय
एकुण बेड - १५५
ऑक्सिजन - ७०
आयसीयु - ७
दैनंदिन गरज - सुमारे २०० सिलेंडर
दळवी रुग्णालय
एकुण बेड - ४०
ऑक्सिजन - ३०
आयसीयु - १०
दैनंदिन गरज - सुमारे ९० सिलेंडर
CoronaVirus News : विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्रास सुरू झाला अन्...https://t.co/8YjR5orAwg#coronavirus#CoronaUpdates#COVID19pic.twitter.com/aHzpSqJt1Y
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला
बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video
"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र