CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना आणावी; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 07:48 PM2020-05-04T19:48:04+5:302020-05-04T20:00:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
पुणे - कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या उपाययोजनाबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकलीhttps://t.co/Asx2Pfvtkt#CoronaUpdatesInIndia#COVID2019india
— Lokmat (@MiLOKMAT) May 4, 2020
आढावा बैठकीत विभागातील तसेच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी, कारोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात. तसेच कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, कोरोना बाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वार्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावेत. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच जास्तीत बेडची सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या.
CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अॅपhttps://t.co/4JvPfZXUR1#CoronaLockdown#farmers
— Lokmat (@MiLOKMAT) May 4, 2020
आरोग्यमंत्री टोपे यांना आढावा बैठकीत विभागातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी माहिती दिली. पुणे महानगरपालिका क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनाच्या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. गायकवाड यांनी तसेच पुणे जिल्ह्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी श्री. राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी माहिती दिली. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अद्यावयत माहिती दिली. ससून रुग्णालयाच्या सोयीसविधा तसेच पदाबाबतची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे यावेळी माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकली
CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण
CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल
CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अॅप
CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव
CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...