CoronaVirus News : कोविडनंतरच्या जगात उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, संधी व कल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:03 AM2020-05-18T04:03:44+5:302020-05-18T06:56:35+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

CoronaVirus News : The challenges, opportunities and trends facing the higher education sector in the post-Kovid world | CoronaVirus News : कोविडनंतरच्या जगात उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, संधी व कल

CoronaVirus News : कोविडनंतरच्या जगात उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, संधी व कल

Next

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शिक्षणक्षेत्रातील सर्वच घटकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले असून या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘लोकमत’तर्फे कोविडनंतरच्या जगात उच्च शिक्षण - आव्हाने संधी व कल’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (दि. १९) सकाळी १० ते ११.३० या वेळेत आयोजिलेल्या वेबिनारमध्ये विद्यार्थी व पालकांना सहभागी होता येणार आहे.
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. सध्या परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात यावे लागेल आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरही कमी-अधिक परिणाम होऊ शकतो. आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून अनेक शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे यापुढील काळात काही अभ्यासक्रम आॅनलाइन
पद्धतीने शिकवणे अनिवार्य करावे लागणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनानंतरच्या जगात शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करावे लागतील, तसेच शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल, कोरोनानंतर शिक्षण महाग होणार की स्वस्त होणार, परदेशातून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, कोरोनानंतरच्या जगात कोणत्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू शकतो, उद्योगक्षेत्राकडून कोणत्या कुशल मनुष्यबळाची मागणी वाढेल, अशा अनेक प्रश्नांवर या वेबिनारमध्ये चर्चा केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रो-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्रो-कुलगुरू व विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजित कदम, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड, सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाच्या प्रो-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षणक्षेत्राच्या भविष्याचा वेध घेणाºया या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत.

नावनोंदणीसाठी लिंकवर क्लिक करा
- विद्यार्थी व पालकांना फेसबुक लाईव्ह व यूट्यूब चैनीच्या माध्यमातून या वेबिनारमध्ये सहभागी होता येईल.
- येत्या मंगळवारी १९ मे रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत होणाºया वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी  http://bit.ly/2X6zGru  या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थी व पालकांना आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येईल.

Web Title: CoronaVirus News : The challenges, opportunities and trends facing the higher education sector in the post-Kovid world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.