CoronaVirus News: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:56 AM2020-08-18T03:56:48+5:302020-08-18T03:57:14+5:30
येरवडा, कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहियानगर-कासेवाडी आणि नवी पेठ-पर्वती या पाच प्रभागांत प्रातिनिधिक स्वरूपात हे सर्वेक्षण करण्यात आले.
पुणे : तब्बल ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅँटिबॉडी विकसित झाल्या असल्याचे पुणे महापालिकेने केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. येरवडा, कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहियानगर-कासेवाडी आणि नवी पेठ-पर्वती या पाच प्रभागांत प्रातिनिधिक स्वरूपात हे सर्वेक्षण करण्यात आले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी ही माहिती दिली. पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले.
पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच प्रभागांतील नागरिकांच्या शरीरातील अॅँटिबॉडीची तपासणी करण्यात आली. त्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी केली गेली. सर्व्हेनुसार या प्रभागांतील ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅँटिबॉडी तयार झाल्या आहेत. याचा अर्थ त्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली असून, त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे.
लोहियानगर-कासेवाडी प्रभागात सर्वाधिक लोकांमध्ये अॅँटिबॉडी
पुण्यातील लोहियानगर-कासेवाडी प्रभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याच प्रभागातील सर्वाधिक जणांनी कोरोनावर मात केली. सिरो सर्व्हेनुसार या भागातील तब्बल ६५.४ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याच्या अॅँटिबॉडी दिसल्या आहेत. याचा अर्थ त्यांना कोरोना होऊन गेला असून त्यांनी त्यावर मात केली आहे.
>प्रभागाचे नाव एकूण अॅँटिबॉडी
नमुने टक्केवारी
येरवडा ३६७ ५६.६
कसबा-सोमवार पेठ ३५२ ३६.१
रास्ता पेठ- रविवार पेठ ३३५ ६५.४
नवी पेठ-पर्वती २९८ ५६.७
एकूण १६६४ ५१.५