CoronaVirus News : सध्याच्या नियमांप्रमाणेच किराणा दुकाने सुरु राहणार, पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 11:27 AM2021-04-20T11:27:27+5:302021-04-20T11:27:57+5:30

CoronaVirus News : राज्य सरकारचे आदेश आल्यानंतरच या नियमावलीची अंमलबजावणी केली जाईल ‌असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

CoronaVirus News: Grocery shops will continue as per current rules, clarification from Municipal Commissioner | CoronaVirus News : सध्याच्या नियमांप्रमाणेच किराणा दुकाने सुरु राहणार, पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   

CoronaVirus News : सध्याच्या नियमांप्रमाणेच किराणा दुकाने सुरु राहणार, पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   

Next
ठळक मुद्देराज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल बैठक पार पडली.

पुणे : राज्य सरकारच्या विचाराधीन असलेल्या लॅाकडाऊन सदृश्य नियमावलीची अंमलबजावणी आज तरी पुण्यामध्ये होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारचे आदेश आल्यानंतरच या नियमावलीची अंमलबजावणी केली जाईल ‌असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.  (Grocery shops will continue as per current rules, clarification from Municipal Commissioner)

राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल बैठक पार पडली. यामध्ये किराणा दुकाने चारच तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियमांची अंमलबजावणी कधीपासून हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्याचाच परिणाम म्हणून लोकांमध्ये वेगवेगळे मेसेज व्हायरल होत आहेत. आणि घाबरुन लोक खरेदीसाठी धावपळ करताना दिसत आहेत. पण या नियमांची अंमलबजावणी आजपासून होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्य सरकारकडून याबाबत कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. हे आदेश मिळाल्यानंतरच याची अंमलबजावणी जाहीर करणारे नवे आदेश महापालिका लागू करेल आणि त्यानंतरच अंमलबजावणी सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज सध्याच्या नियमांप्रमाणेच दुकाने सुरु राहतील.
 

Web Title: CoronaVirus News: Grocery shops will continue as per current rules, clarification from Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.