coronavirus : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आता दर तासाला बस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 06:50 PM2020-03-27T18:50:31+5:302020-03-27T18:51:41+5:30
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून दर तासाला एक बस साेडण्यात येणार आहे.
पुणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आता ५१ मार्गांवर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर तासाला बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच बस मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही मोठी अडचण होत आहे. याप्रश्वभूमीवर पीएमपी कडून केवळ त्यांच्यासाठी बस सोडण्यात येत आहेत. सुरुवातीला ठराविक मार्गांवरच ही सुविधा होती. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा विचार करून आता पुणे व पिंपरी चिंचवड मधील ५१ मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत. एकूण ८७ मिडी व नवीन सीएनजी बस मार्फत ही सुविधा दिली जाणार आहे.
विशेष बस सेवेचे मार्ग पुढीलप्रमाणे (कंसात मार्गे) -
१. स्वारगेट आगार - स्वारगेट ते पुणे स्टेशन (नाना पेठ), स्वारगेट ते सांगवी (बाजीराव रस्ता), स्वारगेट ते धायरी मारुती मंदिर
२. न.ता.वाडी आगार - मनपा ते रावेत (डांगे चौक), मनपा ते हिंजवडी (विशालनगर), मनपा ते मनपा (पाषाण), मनपा ते मनपा (कोथरूड डेपो), पिंपळे निळख ते विश्रांतवाडी (खडकी बाजार), मनपा ते लोहगाव (मूळ रस्ता), मनपा ते वाघोली (नगर रस्ता), मनपा ते केशवनगर मुंढवा (घोरपडी)
३. कोथरूड आगार - कोंढवा गेट ते मनपा (कर्वे रस्ता), कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी (मनपा), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (नारायण पेठ), वारजे माळवाडी ते चिंचवड गाव (सेनापती बापट रस्ता)
४. कात्रज आगार - कात्रज ते शिवाजीनगर (स्वारगेट), कात्रज ते लोहगाव (नाना पेठ), कात्रज ते निगडी (बायपास)
५. हडपसर आगार - हडपसर ते वाघोली (खराडी बायपास), हडपसर ते कात्रज (उंडरी), हडपसर ते पुणे स्टेशन (पुलगेट)
६. मार्केटयार्ड आगार - मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव (खडकी बाजार), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (बाजीराव रस्ता), कोंढवा हॉस्पिटल ते शिवाजीनगर (भाजी मार्केट), अप्पर डेपो ते पुणे स्टेशन (मार्केटयार्ड)
७. पुणे स्टेशन आगार - पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द (पुलगेट), पुणे स्टेशन ते वडगाव शेरी (येरवडा), पुणे स्टेशन ते लोहगाव (विश्रांतवाडी), पुणे स्टेशन ते चिंचवड गाव (येरवडा बायपास)
८. निगडी आगार - रावेत ते मनपा (डांगे चौक), निगडी ते कात्रज (बायपास), निगडी ते मनपा (वाकडेवाडी), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (पिंपळे गुरव), निगडी ते पुणे स्टेशन (औंध, चिंचवड गाव), निगडी ते तळवडे चौक (यमुनानगर), निगडी ते किवळे (देहूरोड), निगडी ते भोसरी (यमुनानगर)
९. भोसरी आगार - भोसरी ते मनपा (वाकडेवाडी), भोसरी ते पिंपरी गाव (नेहरूनगर), भोसरी ते पुणे स्टेशन (विश्रांतवाडी), भोसरी ते हिंजवडी (नाशिक फाटा), भोसरी ते रहाटणी (पिंपरी रोड)
१०. पिंपरी आगार - चिखली ते पिंपरी गाव (मोरवाडी), चिखली ते डांगे चौक (निगडी)
११. भेकराईनगर आगार - हडपसर ते चिंचवड गाव (मनपा, पुणे स्टेशन), भेकराईनगर ते मनपा (स्वारगेट)
१२. शेवाळवाडी आगार - शेवाळवाडी ते कात्रज (स्वारगेट), हडपसर ते कात्रज (कोंढवा)
१३. बालेवाडी आगार - डेक्कन ते सुसगाव (सुतारवाडी, पाषाण), बालेवाडी ते मनपा (बाणेर), मनपा ते म्हाळुंगे (बाणेर).