coronavirus : माेदींनी लाॅकडाऊनची घाेषणा करताच वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:54 PM2020-03-24T21:54:51+5:302020-03-24T21:56:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाॅकडाऊनची घाेषणा केल्याने नागरिकांनी विविध वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र आहे.

coronavirus : people gather to buy commodity after modi announces lock down rsg | coronavirus : माेदींनी लाॅकडाऊनची घाेषणा करताच वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

coronavirus : माेदींनी लाॅकडाऊनची घाेषणा करताच वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Next

वाकड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करताच कोरोनाची कुठलीही भीती न बाळगता अचानकपणे नागरीक खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याने किराणा दुकानात व भाजी विक्रेत्यांकडे एकच झुंबड उडाली आहे.

अचानकपणे पंतप्रधान मोदी यांनी आज रात्री १२ पासून लॉक डाऊनची घोषणा केल्याने रात्री ८.३० पर्यंत ओस पडलेले रस्ते माणसांच्या व वाहनांच्या गर्दीने भरले, दिवसभर असलेला शुकशुकाट गोंधळात परावर्तित झाला आहे लोकांनी 

घरात साठा करून ठेवण्यासाठी संचार बंदी झुगारून तसेच कोरोनाचा धोका पत्करून किराणा दुकान, भाजीपाला, डेअरी, एटीएम यासह मेडिकल दुकानांवर  एकच गर्दी केली आहे. होता मात्र आता संपूर्ण रस्ते लोकांच्या वाहनांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत. त्यामुळे एकत्र न येण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील असे वारंवार स्पष्ट करुन देखील नागरिक या गाेष्टी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. 
 

Web Title: coronavirus : people gather to buy commodity after modi announces lock down rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.