Coronavirus : कोरोनाने पेट्रोल-डिझेलचा खप २३ लाख लिटरने घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:00 PM2020-03-18T22:00:00+5:302020-03-18T22:00:02+5:30
वाहनांची संख्या रोडावली : दुसऱ्यादिवशी बाजारपेठा बंद, पानविक्रेतेही सहभागी
२३ लाख लिटरनी घटलाने पेट्रोवाहनांची संख्या रोडावली : दुसºया दिवशी बाजारपेठा बंद, पानविक्रेतेही सहभागी
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी शहरातील मध्यवर्ती पेठांमधील बाजारपेठा, हॉटेल आणि रेस्टॉरंट, पानटपऱ्या बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दोन-तीन दिवस शुकशुकाट दिसून येत आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या घटल्याने पेट्रोल-डिझेलचा खपही तब्बल ३० टक्क्यांनी (सुमारे २३ लाख लिटर) घटला आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्यात साथ रोगप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. पुणे व्यापारी असोसिएशनशी संलग्न ८२ संघटना यात सहभागी झाल्या आहेत. सराफ व्यावसायिक, कापड, इलेक्ट्रॉनिक, टिंबर मार्केट अशा विविध संघटनांनी कडकडीत बंद पाळला आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध आणि औषध दुकाने वगळता इतर दुकाने बंदमधे सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारदेखील तीन दिवस बंद करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) घेण्यात आला. परिणामी, शहरातील बहुतांश हॉटेलही बुधवारी बंद होती. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, पेठांमधील खाऊगल्ल्यादेखील बंद होत्या. पान विक्रेत्यांपासून अमृततुल्यदेखील तुरळक अपवाद वगळता बंद ठेवण्यात आले.
शाळा-महाविद्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे गेले काही दिवस शहरामधील वर्दळ कमी झाली आहे. बाहेरून शहरात येणाºया प्रवाशांची संख्यादेखील रोडावली आहे. त्याचा एकत्रित परिणाम इंधनाच्या विक्रीवर झाला आहे.
याबाबत माहिती देताना पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, ‘‘रस्त्यावरील वाहनांची संख्या रोडावल्याने इंधनाची विक्री ३० टक्क्यांनी घटली आहे. शहरात दररोज ३० लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. त्याचा खप २१-२२ लाख लिटरपर्यंत खाली आला आहे. तसेच, दररोज ६० लाख लिटर डिझेलचा खप होतो. त्यातही ४०-४५ लाख लिटरपर्यंत घट झाली आहे.
पेट्रोल-डिझेल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांमध्येदेखील रोगाबाबत जागृती करण्यात येत असल्याचे अली यांनी स्पष्ट केले. पेट्रोलचा प्रतिलिटर दर ७५.०६ आणि डिझेलचा ६३.९८ इतका आहे.