CoronaVirus Positive News : पुणे शहरात तपासणी वाढली तरी "कोरोना पॉझिटिव्ह" ची टक्केवारी घटली             

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:00 AM2020-05-13T06:00:00+5:302020-05-13T06:00:07+5:30

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्के 

CoronaVirus Positive News : Although the incidence increased, the percentage of corona positive decreased | CoronaVirus Positive News : पुणे शहरात तपासणी वाढली तरी "कोरोना पॉझिटिव्ह" ची टक्केवारी घटली             

CoronaVirus Positive News : पुणे शहरात तपासणी वाढली तरी "कोरोना पॉझिटिव्ह" ची टक्केवारी घटली             

Next
ठळक मुद्देकेवळ कोरोनामुळेच मृत्यू झाला असा एकही जण नाही सध्या पुणे शहरात शहरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांचा वयोगट हा २० ते ४० कोरोनाबाधित रूग्णांपैकी पालिकेने जाहिर केलेल्या ६९ कंटन्मेंट झोनमधीलच ९० ते ९२ टक्के रूग्ण

निलेश राऊत-
पुणे : पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून नागरिकांच्या स्वाब तपासणीचे प्रमाण दुप्पटीने वाढले असले तरी, यापैकी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत दररोज साधारणत: ५०० ते ६०० जणांचे स्वाब तपासण्यात येत होते, त्यापैकी पॉझिटिव्ह अहवालाची टक्केवारी ही १३़५ टक्के इतकी होती.मात्र, आता दररोज १५०० ते १६०० स्वाब तपासणी होत असून, यातील पॉझिटिव्ह अहवालचे प्रमाण  साधाणत: ९ ते १० टक्के इतकेच आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांपैकी कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीही ८० टक्क्यांच्यावर गेल्याची सकारात्मक बाजू समोर आली आहे. 
    महापालिका प्रशासनाकडून शहरातील ६९ कंटन्मेंट झोन वगळता अन्य भाग काही निर्बंध घालून दैनंदिन व्यवहारासाठी घेऊन खुले करण्यात आले. या निर्णयाचे बहुतांशी जणांनी स्वागतही केले, तर काहींनी ही शिथिलता कोरोनाच्या संसर्गाला आमंत्रण देणारी असल्याची भावनाही व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडील कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता, शहरातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी पालिकेने जाहिर केलेल्या ६९ कंटन्मेंट झोनमधीलच ९० ते ९२ टक्के रूग्ण असल्याचे दिसून आले आहे. ११ मे पर्यंत सर्वाधिक कंटन्मेंट झोन असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांपैकी भवानी पेठ येथे ५११, ढोले पाटील रोड येथे ४०९, घोले रोड येथे ३२६, कसबा-विश्रामबाग येथे ३१९ व येरवडा धानोरी येथे २९४ रूग्ण आढळून आले आहेत. 
    संपूर्ण शहरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांचा वयोगट हा २० ते ४०  हा असून, याला महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्याकडून लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरण्याचे प्रमाण किंवा फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणे हेच असल्याचे आढळून आले आहे़.
    महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यापैकी ८० टक्के रूग्ण हे खात्रीशीर कोरोनामुक्त होणारे आहेत. तर उर्वरित १५ टक्के रूग्ण हे तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेले, किंबहुना जास्त काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागणारे आहेत. परंतू, ज्या रूग्णांचा मृत्यू होत आहे ते अन्य आजाराने पहिल्यापासूनच त्रस्त असलेलेच आहेत. केवळ कोरोनामुळेच मृत्यू झाला असा एकही जण सध्या पुणे शहरात नाही. एकंदर कोरोनाबाधितांची एकूण संख्या व कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पाहता मृत्यूचे प्रमाण हे अतिशय कमी असल्याचे आढळून आले असून, ही टक्केवारी एकूण कोरोनाबाधित संख्येशी तुलना करता साधारणत: ५़२ टक्के इतकीच आहे.     
    मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला. तो आकडा आजमितीला ( ११ मेपर्यंत ) २ हजार ५८२ वर गेला आहे. परंतू, यापैकी ४२ टक्के रूग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित १ हजार ३३५ रूग्णांवर उपचार चालू असून, यापैकी केवळ ७.३ टक्के रूग्णांची प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार सुरू आहेत. 
-----------------
रूग्ण वाढीचा वेग साधारणत: एकास तीन असा 
पुणे शहरात ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ असे बहुतांशी रूग्ण हे दाट वस्तीतील आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या साधारणत: तीन व्यक्तींना याची लागण होते हे अनेक केसेसमध्ये देशातही दिसून आले आहे. त्यानुसार कोरोना रूग्ण वाढीचे प्रमाण एकास तीन असे गृहित धरले गेले आहे. त्यानुसार सद्यस्थितीला पुणे शहरात २ हजार ५०० च्या वर कोरोनाबाधित असले तरी, त्यांच्यामुळे अंदाजे साडेसात ते आठ हजार नागरिक बाधित झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच गणितीय शास्त्रानुसार प्रशासनाने दहा हजार खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. परंतू, गेल्या काही दिवसांपासून रूग्णांच्या दुप्पटीचा कालावधी हा ८ दिवसांवरून १२ दिवसांवर आला आहे. त्यातच ज्या ठिकाणी रूग्ण सर्वाधिक आढळून येत आहे. तो भाग सोमवारपासून पूर्णपणे सील केल्यामुळे हा संसर्ग रोखण्यासही मोठी मदत मिळणार असल्याचा प्रशासनास विश्वास आहे. 

Web Title: CoronaVirus Positive News : Although the incidence increased, the percentage of corona positive decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.