CoronaVirus Positive News : देशातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ३१ टक्के तर पुण्याचे ४९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 04:44 PM2020-05-14T16:44:27+5:302020-05-14T16:57:20+5:30
देशातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ३१ टक्के असून पुण्याचे ४९ टक्के
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जरी २ हजार ८२४ झाली असून प्रत्यक्षात अॅक्टिव्ह (प्रत्यक्षात उपचार घेत असलेले) १ हजार २८४ रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरातील आकडेवारी पाहिली तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. यासोबतच मृत्यूदर स्थिर ठेवण्यातही यश आले असून आठवड्याभरापासून मृत्यूचा आकडा सरासरी ६ एवढा असून हा दर स्थिर राहिला आहे. आतापर्यंत १३७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा ४९ टक्के एवढा आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. विशेषत: भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, येरवडा-कळस-धानोरी आणि कसबा-विश्रामबाग या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. हे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरातील या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील अति संक्रमित भाग पूर्णपणे सील करण्यात आला असून याठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. प्रभावी उपचारांद्वारे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ३१ टक्के असून पुण्याचे ४९ टक्के आहे. ही सकारात्मक बाब असून आजवर कोरोनामुक्त झालेले रुग्ण जुन्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार सोडण्यात आलेले आहेत. यापुढे नवीन डिस्चार्ज पॉलिसीप्रमाणे रुग्ण घरी सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर, ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
======
आठवड्यातील रुग्णांचा तपशील
तारीख एकूण रुग्ण डिस्चार्ज एक्टिव्ह बरे झालेले (एकूण)
06 मे 2029 52 1297 587
07 मे 2146 84 1350 671
08 मे 2245 61 1377 732
09 मे 2380 96 1414 826
10 मे 2482 194 1318 1020
11 मे 2573 69 1335 1089
12 मे 2737 120 1372 1209
13 मे 2824 168 1284 1377