Coronavirus In Pune : पुणे शहरात मंगळवारी ५ हजार ६०० तर पिंपरीत २ हजार ९०४ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:59 PM2021-04-06T20:59:24+5:302021-04-06T20:59:34+5:30

पुणे शहरात कोरोनाबाधितांची टक्केवारी ३२.२९ टक्के 

Coronavirus In Pune: 5,600 new coronaviruses in Pune and 2,904 in Pimpri on Tuesday | Coronavirus In Pune : पुणे शहरात मंगळवारी ५ हजार ६०० तर पिंपरीत २ हजार ९०४ नवे कोरोनाबाधित

Coronavirus In Pune : पुणे शहरात मंगळवारी ५ हजार ६०० तर पिंपरीत २ हजार ९०४ नवे कोरोनाबाधित

Next

पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा मंगळवारी पुन्हा साडेपाच हजाराच्या पुढे गेला असून मंगळवारी केलेल्या १७ हजार ३८९ तपासणीमध्ये ५ हजार ६०० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३२.२९ टक्के इतकी आहे. 

शहरात आजही मृत्यूचा आकडा ३० च्या पुढे असून, आज शहरातील ३८ जणांचा तर शहरात उपचार घेणाऱ्या ९ अशा ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही रविवारी १.८४ टक्के इतकी आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ९९ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत.  तर ९१५ रूग्ण हे गंभीर आहेत.  तर आज दिवसभरात ३ हजार ४८१ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४४ हजार ८२२ इतका झाला आहे. 

शहरात आजपर्यंत १५ लाख ९३ हजार ७३६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ९९ हजार ७२१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ४९ हजार ३७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५२६ झाली आहे.

==============

पिंपरीत कोरोना विळखा पुन्हा वाढला; २९०४ जण पॉझिटिव्ह, २९१३ निगेटिव्ह

पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. काल पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांनी कमी झाली होती. ती दुसऱ्याच दिवशी एक हजारांनी वाढली आहे.  दिवसभरात २ हजार ९०४ रुग्ण सापडले असून १ हजार ६७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५ हजार २८७ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  दाट लोकवस्तीत कोरोना वाढला आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात  कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २१०० आलेली रुग्णसंख्या हजारांनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ६ हजार ५१४ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ९१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ७५२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ९६९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज पाच हजार एक जणांना डिस्चार्ज दिला आहे.

............................

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तुलनेत फारशी वाढ नाही. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार १२९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ९८४ वर गेली आहे.

..................................

पंधरा जणांचा बळी

कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कमी झाली. शहरातील १५आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १७ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील १० पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. त्यात तरुण आणि ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०९४ वर पोहोचली आहे.

......................

१० हजार जणांना लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. शहरातील महापालिकेच्या ५९ आणि खासगी २१ अशा एकूण ८० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात ८ हजार ३३२ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह १ हजार ६७९ जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाºया ९ हजार ८०० जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या २ लाख ८ हजार ७९५ वर  पोहोचली आहे.

Web Title: Coronavirus In Pune: 5,600 new coronaviruses in Pune and 2,904 in Pimpri on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.