CoronaVirus पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:14 AM2020-04-11T06:14:25+5:302020-04-11T06:14:33+5:30
२०९ पैकी २५ जणांचा मृत्यू; राज्यात मुंबईत सर्वाधिक मृत्यू
राजानंद मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभर कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत असताना पुण्यात रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही अन्य शहरे व राज्यांच्या तुलनेत अधिक वाढत चालली आहे. किमान १०० हून अधिक बाधित रुग्ण व त्यातील मृतांचा आकडा पाहिला तरी देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे आकडेवारीच्या विश्लेषणावरून स्पष्ट झाले आहे.
पुण्यात गुरुवारअखेरपर्यंत २०९ बाधित रुग्णांपैकी २५ जणांचा मृत्यू झाला असून, हा आकडा महाराष्ट्र वगळता अन्य सर्व राज्यांपेक्षा अधिक आहे. राज्यात मुंबईतील मृतांची संख्या सर्वाधिक असली तरी तेथील रुग्णांची संख्याही अधिक असल्याने मृत्यूदर सहाच्या जवळपास आहे. पुण्याचा मृत्यूदर ११.९६ टक्के तर जगाचा मृत्यूदर ५.९ इतका आहे.
सुरूवातीला मुंबईतील रुग्ण व मृतांची संख्या अधिक वाटत होती. पण मागील चार-पाच दिवसांत पुण्यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू वाढले आहे होते.