coronavirus: पुणे विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढले, मृत्युदरही झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:58 AM2020-07-06T05:58:56+5:302020-07-06T05:59:13+5:30
पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे : पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत विभागात तब्बल २० हजार ३४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ६० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. तर मृत्यूचा दर देखील कमी झाला असून, सध्या तो ३.६२ पर्यंत आला आहे.
पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे जिल्ह्यात २८ हजार ४७ बाधित रुग्ण असून १६ हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजार ४६७ आहे. एकूण ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात १ हजार ३०४ बाधित असून ७८४ रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४६५ आहे. ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ३ हजार १०२ बाधित असून १ हजार ८३४ रुग्ण बरे झाले. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९७९ आहे. २८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात ४६३ बाधित असून २६२ रुग्ण बरे झाले. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १८९ आहे. एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ९४१ बाधित असून ७३८ रुग्ण बरे झाले आहेत.