Coronavirus Pune : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:19 PM2021-04-20T13:19:51+5:302021-04-20T13:24:23+5:30

पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते.

Coronavirus Pune : Good news for Pune citizens! The ever-increasing number of coronaviruses stabilized to some extent | Coronavirus Pune : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली

Coronavirus Pune : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली

googlenewsNext

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या कोरोना ग्रस्तांच्या संख्येमुळे पुणेकरांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुणेकरांसाठी आता काहीसा दिलासा देणारी ही बातमी समोर आली आहे. सातत्याने वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या आता काही प्रमाणात कमी होत स्थिरावली आहे.पुण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या स्थिरावणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे महापालिकेला दर आठवड्याला अंदाज देणाऱ्या अतुल मुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

पुणे शहरात टेस्ट पॅाझिटिव्हीटी रेशो अर्थात चाचण्यांच्या तुलनेत दिसणारे रुग्णसंख्येचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. अर्थात पुढचे काही दिवस ही घट अशीच कायम राहिली तरच दुसरी लाट कमी होण्याची चिन्ह दिसत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. 

 

पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते. पण आता मात्र गेल्या काही दिवसात यामध्ये दिलासा मिळालेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेशो हा २५% ते २१ % पर्यंत आलेला पहायला मिळत आहे. ३० टक्क्यांच्या वर गेलेले हे प्रमाण कमी होणे ही नक्कीच दिलासादायक बाब ठरत आहे. 

आज देखील शहरात 21,922 चाचण्या झाल्या तर यामध्ये 5395 रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले. यानुसार टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट हा २४.६% आहे. ३३% वर गेलेला हा रेट २४% वर येणं हा शहरासाठी दिलासा मानला जात आहे. 

अर्थात तपासणी देखील काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले “ गेल्या ४-५ दिवसांत हा रेशो कमी होवुन त्याचा प्लॅटु झालेला दिसतो आहे. म्हणजे हे प्रमाण स्थिर झाले आहे. साधारण १० ते १५ दिवस हे प्रमाण असेच राहिले तर तो दिलासा देणारी बाब ठरणार आहे.

Web Title: Coronavirus Pune : Good news for Pune citizens! The ever-increasing number of coronaviruses stabilized to some extent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.