Coronavirus Pune : गूड न्यूज ! पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्या हजार पेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:51 PM2021-05-20T16:51:33+5:302021-05-20T20:40:16+5:30

चाचण्या कमी न होता रुग्ण संख्या कमी होणं मोठा दिलासा

Coronavirus Pune: Less than a thousand patients in Pune again today | Coronavirus Pune : गूड न्यूज ! पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्या हजार पेक्षा कमी

Coronavirus Pune : गूड न्यूज ! पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्या हजार पेक्षा कमी

Next

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याचा मधला दिवस असून देखील एकुण रुग्णसंख्या हजारांचा आत आली आहे. चाचण्यांचे प्रमाण कायम असताना एकुण रुग्णसंख्या आटोक्यात येणं हा मोठा दिलासा मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. शहरात जवळपास पाच हजाराच्या घरात ही रुग्णसंख्या गेली होती. मात्र गेल्या काही आठवड्यात लॉकडाऊन लागला त्यानंतर ही संख्या हळू हळू कमी व्हायला सुरुवात झाली.

कोरोनाबाधितांची संख्या गुरूवारी पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, आज दिवसभरात शहरात केवळ ९३१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.या आठवड्यात रूग्णवाढ सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले असून, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १५ हजार ४३ वर आली आहे. आज दिवसभरात १ हजार ७६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

आज दिवसभरात १२ हजार २२६ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही केवळ ७.६१ टक्के इतकी आढळून आली आहे. रविवारपासून तपासणीचे प्रमाण दहा हजाराच्या आसपास असतानाही आज यात दोन हजाराने वाढ झाली तरी, नव्या कोरोनाबाधितांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण पुण्याबाहेरील आहेत. आजचा मृत्यूदर हा १़७० टक्के इतका आहे़.

ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही आता शहरात पाच हजाराच्या आत आली असून, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ३६० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर १ हजार ३२८ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ४ हजार ३२४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६३ हजार १०३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ४० हजार १७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ७ हजार ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कमी झालेल्या रुग्ण संख्येचा पार्श्वभूमीवर आता पुणे शहराला लॉकडाऊनचा नियमात काही दिलासा मिळतोय का हे पहावा लागेल. 

 

Web Title: Coronavirus Pune: Less than a thousand patients in Pune again today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.