Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्याचे मार्केट यार्ड दोन दिवसांसाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 08:59 PM2020-03-18T20:59:05+5:302020-03-18T21:03:55+5:30

पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये दररोज राज्य, तसेच परराज्यांतून सुमारे तीनशे ते चारशे वाहनांतून शेतमालाची आवक

Coronavirus : Pune Market Yard closed for two days due to Corona exposure | Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्याचे मार्केट यार्ड दोन दिवसांसाठी बंद 

Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्याचे मार्केट यार्ड दोन दिवसांसाठी बंद 

Next
ठळक मुद्दे बाजारआवारात खरेदी-विक्री व्यवहारांसाठी सुमारे १५ ते २० हजार नागरिकांची ये-जा आडते व कामगार स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार

पुणे : पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील तरकारी विभाग, फळबाजार, कांदा-बटाटा मार्केट येते. दोन दिवस म्हणजे शुक्रवार व शनिवार बंद ठेवणार आहे. दरम्यान, मार्केट बंदच्या काळात संपूर्ण बाजार आवार निजंर्तुकीकरण करावा, अशी मागणी आडते आणि कामगार संघटनांच्या वतीने केल्या आहेत. 
पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये दररोज राज्य, तसेच परराज्यांतून सुमारे तीनशे ते चारशे वाहनांतून शेतमालाची आवक होते. बाजारआवारात खरेदी-विक्री व्यवहारांसाठी सुमारे १५ ते २० हजार नागरिकांची ये-जा असते. कोरोनाच्या संसगार्मुळे बाजारात आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याने २० आणि २१ मार्च रोजी फळबाजार, तरकारी, आणि कांदा-बटाटा विभाग स्वयंस्फूतीर्ने बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या आडते व कामगारांच्या बैठकीत घेतला. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, राजेंद्र कोरपे, युवराज काची, सचिन पायगुडे, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, नितीन जामगे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, राजेश मोहोळ, राजेंद्र चोरगे उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.२०) आडते व कामगार स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार आहेत. तर, शनिवारी (दि.२१) साप्ताहिक सुटीमुळे कामकाज बंद असते. त्यामुळे सलग दोन दिवस बाजार आवारातील स्वच्छता करणे शक्य होईल. कोरोनाचा संसर्ग आणि पुढील परिस्थिती विचारात घेऊन कामकाजाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विलास भुजबळ यांनी सांगितले.
बाजारात शेतकरी, ग्राहक, आडते, व्यापारी, टेम्पोचालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या सुमारे मोठी असून, बाजारात दररोज पंधरा ते वीस हजार नागरिक येतात. बाजार आवाराचे अद्याप निजंर्तुकीकरण केले नाही. बाजार बंद केल्यानंतर बाजार समितीने प्राधान्याने बाजार आवाराची स्वच्छता तसेच निजंर्तुकीकरण करावे. तसेच, बाजारात मोठ्या प्रमाणात पानटपºया असून त्या परिसरात तंबाखू, पान खाऊन नागरिक थुंकतात. त्यामुळे बाजारातील पानटपºया बंद कराव्यात, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली.
--
फुलबाजार सलग तीन दिवस बंद
फुले ही नाशवंत असली, तरी आत्यावश्यक सेवेमध्ये त्यांचा समावेश होत नाही. फुलबाजारात होणाºया गदीर्मुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यामुळे २० ते २२ मार्च या तीन दिवसांच्या काळात बंद ठेवणार आहे, अशी माहिती फुलबाजार आडते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड आणि अखिल मार्केट यार्डात फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. बंदच्या काळात बाजार आवारात औषध फवारणी आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी  केली.
गूळ भुसार विभाग सुरू
मार्केट यार्डातील फळभाज्या आणि फुलबाजार विभागाची परिस्थिती आणि गूळ भुसार विभाग बाजाराची परिस्थिती भिन्न आहे. भुसार बाजारात लांबून आवक होत असते. त्यामुळे गूळ-भुसार विभाग सुरळीत सुरू राहणार आहे. पुढील परिस्थिती पाहून बंदबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.

Web Title: Coronavirus : Pune Market Yard closed for two days due to Corona exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.