Coronavirus Pune : बाप रे ! पुणे शहरात कोरोना रूग्णवाढीचा गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांक, ७ हजार नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:54 PM2021-04-08T20:54:37+5:302021-04-08T20:56:15+5:30
पिंपरीतही २३५१ नवे कोरोना रुग्णांची वाढ....
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीच्या संख्येने गुरूवारी पुन्हा उच्चांक गाठला असून, दिवसभरात ७ हजार १० नवे रूग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात २३ हजार ५९५ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २९.७० टक्के इतकी आहे.
शहरातील मृत्यूचा आकडाही ५० च्या पुढे गेला असून, शहरातील ४३ जणांचा तर शहरात उपचार घेणाऱ्या पुण्याबाहेरील १६ अशा ५९ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी आज १़७.९ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ४६५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ९९९ रूग्ण हे गंभीर आहेत़ तर आज दिवसभरात ४ हजार ९९ कोरोनाबाधितही कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४८ हजार ९३९ इतका झाला आहे.
शहरात आजपर्यंत १६ लाख ४३ हजार ४५१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख १२ हजार ३८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ५७ हजार ८३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ६१० झाली आहे.
....
पिंपरीत २३५१ जण पॉझिटिव्ह, १२५७८ निगेटिव्ह
पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. दिवसभरात सर्वाधिक सातशे रुग्ण थेरगाव, सांगवी, नवी सांगवी, काळेवाडी परिसरात आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चारशेंनी कमी झाली आहे. १ हजार ४५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तपासण्यांची संख्या पंधरा हजारांवर गेली असून त्यात १२ हजार निगेटिव्ह आढळले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २७०० आलेली रुग्णसंख्या चारशेंनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात १५ हजार ५७८ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ृ१२ हजार ९४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ हजार ०२५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ४ हजार ४९२ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज १४ हजार जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ८३९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ११९ वर गेली आहे.