Coronavirus : ...अन् पुण्यात रस्त्यावर भरले योगा क्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:37 AM2020-04-16T10:37:18+5:302020-04-16T11:06:29+5:30
Coronavirus : पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यावर योगा क्लास सुरू असल्याचे आढळून आले.
पुणे : लॉकडाऊन सुरू असताना गुरुवारी सकाळी पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यावर योगा क्लास सुरू असल्याचे आढळून आले. नाही हे काही नेहमीचे योगा क्लास नव्हते तर विनाकारण रस्त्यावर फिरणार्या आणि सकाळी फिरायला येणार्या पकडून पोलिसांनी त्यांना योगा करायला लावले होते.
शहरात दररोज कोराना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अर्ध्या शहरात कर्फ्यू लागू करुन परिसर सील करण्यात आला आहे. असे असतानाही असंख्य पुणेकरांना त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे या सर्वांना कायदेशीर कारवाई करण्याइतके पोलीस बळ अडकवून ठेवणेही पोलिसांना शक्य होत नाही. त्यावर पोलिसांनी एक नामी शक्कल लढविली.
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे' https://t.co/CieqAMUhBQ#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 16, 2020
सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी गुन्हे शाखेला आदेश दिला. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच गुन्हे शाखेची पथके आज पहाटेपासून रस्त्यावर उतरली होती. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी रस्त्यावर उतरलेल्यांना थांबविले. भर रस्त्यात त्यांच्याकडून सूर्यनमस्कार, जागेवरच उड्या मारणे, उठाबश्या काढणे असे विविध प्रकार त्यांच्याकडून करवून घेतले. शहरातील हडपसर, चतु:श्रृंगी, बिबवेवाडी या परिसरात हा प्रकार प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
बिबवेवाडी येथे जवळपास ७० जणांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून भर रस्त्यावर सूर्यनमस्कार घालण्यात भाग पाडण्यात आले. हडपसरमध्येही ५४ जणांना व्यायाम करायला लावला. शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करुन विनाकारण बाहेर पडणार्यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.
Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!https://t.co/ZYpnmtNom7#CoronaUpdatesInIndia#CoronavirusLockdown#marriage
— Lokmat (@MiLOKMAT) April 16, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!
Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्...
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'
२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू