Coronavirus Pune : 'रेमडिसिव्हीर'इंजेक्शनची मेडिकलमधील विक्री बंद; प्रशासनाचा अत्यंत महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:44 PM2021-04-10T17:44:13+5:302021-04-10T17:45:40+5:30
पुण्यात गेले काही दिवस सरसकट रेमडेसिव्हीरसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आले.
पुणे : रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून रुग्णाला हा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.सौरभ राव यांनी दिली आहे.
पुण्यात गेले काही दिवस सरसकट रेमडेसिव्हीरसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आले. यामध्ये रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन आणत लोक मेडिकलमध्ये गर्दी करत आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना इंजेक्शन मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “शासकीय रुग्णालयात जर दोन रेमडेसिव्हिर वापरले जात असेल तर खासगी मध्ये त्याचे प्रमाण १००% असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात जर रुग्णालयात एखादा माणूस ॲडमिट आहे तर त्याला तिथूनच इंजेक्शन पुरवले गेले पाहिजे. त्यामुळे हे निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”