coronavirus : काेराेनामुळे पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:29 PM2020-03-11T13:29:18+5:302020-03-11T15:41:19+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमिवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यासा मेसेज साेशल मीडियावर व्हायरल हाेताेय.
पुणे : देशभरात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत असताना आता पुण्यात देखील काेराेनाचे पाच रुग्ण आढळल्याचे समाेर आले आहे. दुबईवरुन पुण्यात आलेल्या दांपत्याला सर्वप्रथम काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलीला तसेच ते ज्या टॅक्सीने पुण्यात आले त्या टॅक्सी ड्रायव्हरला काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दांपत्यासाेबत जे 40 लाेक दुबईला फिरण्यास गेले हाेते, त्यांचा देखील शाेध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
पुण्यात काेराेनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर काहीसे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या शाळेत त्या दांपत्याची मुलगी शिकत हाेती त्या शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. यात सर्व सरकारी डाॅक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
काेराेनाचे रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर त्याच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेमहाविद्यालयांना 20 ते 30 मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. याबाबत विद्यापीठाच्या प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा मेसेज खाेटा असून असे कुठलेही निवेदन विद्यापीठाने प्रसिद्ध केले नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. हा काेणीतरी खाेडसाळपणा केला असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत विद्यापीठाकडून याेग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी सांगितले आहे.