coronavirus : पुण्यात आता औषधे मिळणार घरपाेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:20 PM2020-03-27T12:20:38+5:302020-03-27T12:21:26+5:30
लाॅकडाऊन मुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असल्याने आता नागरिकांना घरपाेच औषधे देण्यात येणार आहेत.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच घरातील आजारी व्यक्ती यांना आता घरपोच औषधे मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची गरज नाही. अखिल भारतीय औषध संघटनेच्या वतीने "घरपोच औषधे" उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नुकतीच शहरातील औषध संघटनेची बैठक पोलीस प्रशासन यांच्याबरोबर पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी सांगितले. घरपोच औषधे हवी असल्यास संघटनेच्या वतीने 9822404960, 9822519301, 9834318190, 9823856507 आणि 9890951503 हे व्हाट्सअप क्रमांक देण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना औषधाची गरज आहे त्यांनी रोज सायंकाळी सहा पर्यत या क्रमांकावर नाव, पत्ता आणि प्रिस्क्रिप्शन तसेच संपर्क क्रमांक देणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी औषधे घरपोच मिळणार आहेत. संघटनेच्या वतीने ही सेवा पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी 9850275824 तर ग्रामीण भागातील नागरिकांनी 9960752777 आणि 9890188909 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.