Coronavirus: बारामतीत सापडला सातवा कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण; 75 वर्षीय ज्येष्ठाला कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:26 PM2020-04-14T22:26:23+5:302020-04-14T22:26:46+5:30
मागील आठवड्यात समर्थनगर येथील भाजीविक्रेत्यासह कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नातवंडे कोरोनाचा संसर्गबाधित झाले होते.
बारामती - बारामती शहरात कोरोना चा संसर्ग झालेला सातवा रुग्ण सापडला आहे .त्याचा तपासणी अहवाल ' पोसिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे .शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो .त्या रुग्णाचा मुलगा औषधविक्रेत्या कडे कामाला आहे .
मागील आठवड्यात समर्थनगर येथील भाजीविक्रेत्यासह कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नातवंडे कोरोनाचा संसर्गबाधित झाले होते .यामध्ये 9 एप्रिल ला त्या रुग्णाचा म्रूत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील इतरांवर पुण्यात उपचार सुरू आहेत . त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे बारामतीकराना दिलासा मिळाला होता .मात्र आज पुन्हा आणखी एक रुग्ण सापडल्याने बारामतीकरांची काळजी वाढली आहे .आज शहरात सापडलेला कोरोनाबाधित संसर्ग असणारा सातवा रुग्ण आहे .त्याचे वय 75 आहे .हा रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा , या बाबत प्रशासन शोध घेत आहे .
शहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत .त्यापैकी एका रुग्णाचा म्रूत्यू झाला आहे .पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. दरम्यान , हा परिसर पोलिसांनी सील केला आहे .नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी औषधफवारणी सुरू केली आहे .आज सापडलेल्या रुग्णामुळे बारामतीकर पुन्हा धास्तावले आहेत.