coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 08:39 PM2020-04-05T20:39:43+5:302020-04-05T20:40:21+5:30

मार्फत निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

coronavirus: a sterile cell created by DRDO rsg | coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष

coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष

Next

पुणे :  डीआरडोतर्फे देशाची गरज लक्षात घेऊन आरोग्य संसाधनांची निर्मिती करण्यात येत आहे.  संस्थेच्या अहमदनगर येथील वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (व्हीआरडीई) येथे 'पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोझर' म्हणजेचे निर्जंतूकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात  वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.  सॅनिटायझर आणि  साबणाची सुविधा असलेला हा एक 'पोर्टेबल कक्ष' असून यात प्रवेश करताच यातून सॅनिटायझरची फवारणी सूरू होऊन संबंधित व्यक्तीचे निर्जंतूकीकरण करता येते. ही प्रक्रिया केवळ  २५ सेकंदातच ही प्रक्रिया पूर्ण होते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध वैद्यकीय संसाधनांचा उत्पादनाचे कार्य वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर डीआरडीओच्या अहमदनगर आणि हैद्राबाद आणि चंदिगढ येथील प्रयोगशाळांतीन वैद्यानिक आणि तंत्रज्ञांनी दोन यंत्रणे तयार केली आहे.  हैद्राबाद आणि चंडीगड येथील आरसीआय व टीबीआरएल या प्रयोगशाळांमध्ये चेह-याच्या संरक्षणासाठी 'फेसशिल्ड'ची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा संपर्कात असलेल्या डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचा-यांसाठी  हा फेसशिल्ड महत्वाचा ठरणार आहे. हा फेसशिल्ड वजनाने हलका असून  दीर्घ काळ याचा वापर करता येऊ शकतो.  हे फेसशिल्ड बायोडीग्रडेबल आहेत. प्रयोगशाळांमध्ये दररोज १०० फेसशिल्ड तयार करण्यात येत आहेत. हे फेसशिल्ड हैद्राबाद येथील ईएसआयसी व चंडीगडच्या पीजीआयएमइआर या रुग्णालयांना पुरविण्यात येत आहेत. या फेसशिल्डचा यशस्वी वापराच्या चाचण्यांवर आधारित पीजीआयएमईआर आणि ईएसआयसी रुग्णालयांकडून आणखीन दहा हजार फेसशिल्डची मागणी करण्यात आली आहे.

या निर्जंतूकीकरण  कक्षात सुमारे ७००  लीटरचे सॅनिटायजर ठेवता येते
या निर्जंतूकीकरण  कक्षात सुमारे ७००  लीटरचे सॅनिटायजर ठेवता येते. तसेच  रीफिलची आवश्यकता होईपर्यंत सुमारे ६५० कर्मचारी निजंर्तुकीकरणासाठी या कक्षातून जाऊ शकतात. ही यंत्रणा चार दिवसांच्या कालावधीत तयार करण्यात आली. रुग्णालये, मॉल्स, कार्यालयीन इमारती सारख्या ठिकाणी कर्मचा-यांच्या निजंर्तुकरणासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
 

Web Title: coronavirus: a sterile cell created by DRDO rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.