coronavirus: वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरेंना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:56 PM2020-09-02T23:56:23+5:302020-09-02T23:57:00+5:30
आमदार सुनील टिंगरे यांना दोन दिवसांपासुन ताप येत होता व कणकण होती. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
चंदननगर - वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार सुनील टिंगरे यांना दोन दिवसांपासुन ताप येत होता व कणकण होती. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यांनी सदर माहिती त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट टाकून दिली.
आज सकाळी वडगावशेरी मधील गणेशनगर येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटाची पाहीण करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे आले होते.त्यांच्या सोबत नगरसेवक, अधिकारी व स्थानिक नागरिक घोळका करून बोलत होते. यावेळी कोणताही सोशलडिस्ट्न पाळला गेला नाही. त्यावेळी घटनास्थळी दोनशेहुन अधिक नागरी याठिकाणी होते.
On noticing initial symptoms, I have tested positive for #COVID19. My symptoms are mild, but I have been hospitalized as a precaution. I request all those who have come in contact with me in the last few days to be extra vigilant of symptoms and self-isolate as a precaution.
— Sunil Tingre (@suniltingre) September 2, 2020