Coronavirus: अखंड हरिनाम सप्ताह गावाला भोवला; गावात ३० जण आढळले कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 09:21 PM2021-03-04T21:21:51+5:302021-03-04T21:22:05+5:30
अखंड हरिनाम सप्ताह गावाला भोवला तर नाही ना अशी चर्चाही परिसरात व्यक्त होत आहे
पुणे - पिंपळे (ता इंदापूर )येथे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन केलेल्या हॉटस्पॉट सर्व्हेत तब्बल तीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. त्यानंतर गावात सप्ताहा मधील सहभागी असलेला एक कार्यकर्ता कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने गावात खळबळ उडाली. त्यानंतर लक्षणे जाणवत असल्याने काहीजणांनी स्वतःहून टेस्ट करण्यास सुरुवात केली.त्यानंतर धक्कादायक चित्र समोर आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह गावाला भोवला तर नाही ना अशी चर्चाही परिसरात व्यक्त होत आहे. पिंपळे गावात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह संख्या वाढताना दिसल्याने आरोग्य विभागाने आज घरोघरी जाऊन हॉटस्पॉट सर्वे केला यासंदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ कैलास व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आज एका दिवसात 30 रुग्ण आढळून आले आहेत. तर डॉ गणेश पवार यांनी माहिती देताना सांगितले की आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव संख्या पिंपळे गावात वाढत असल्याचे लक्षात आले. त्यांनंतर आज घरोघरी जाऊन लोकांना कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी त्याचे मार्गदर्शन करीत सुमारे 119 लोकांची तपासणी केली. त्यामध्ये 30 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर यापूर्वीचे सहा रुग्ण ॲक्टिव आहेत.
पिंपळे गावातील कोरोना रुग्णांचा आकडा 36 वर गेला आहे. तसेच या परिसरात एका गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याची तपासणी मृत्यूनंतर तपासणी केली असता तोही कोरोना पॉझिटिव आल्याने या परिसरात कोरोनाची दुसरी लाट तर नाही ना अशी काळजी देखील लोकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.