CoronaVirus भारतीयांना रोगप्रतिकारशक्ती वाचवेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:37 AM2020-04-09T05:37:19+5:302020-04-09T05:37:34+5:30

कोरोना व्हायरसच्या मुद्यावर वैद्यकीय व्यावसायिकांत चर्चा : अभ्यास व संशोधनाची व्यक्त होते आहे गरज

CoronaVirus Will immunity power save Indians? | CoronaVirus भारतीयांना रोगप्रतिकारशक्ती वाचवेल का?

CoronaVirus भारतीयांना रोगप्रतिकारशक्ती वाचवेल का?

Next



राजू इनामदार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जगण्याच्या लढाईत तिन्ही त्रिकाळ वेगवेगळ्या समस्यांना निधड्या छातीने तोंड देणाऱ्या भारतीयांना आजार काही नवे नाहीत. त्यांचा हा निर्धार गुणसूत्रांमधलाच असला तर कोरोना विषाणूंवरही ते यशस्वी मात करतील, अशी चर्चा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांमध्ये कोरोना व्हायरसच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. त्याचाच वेध काही तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर बोलून घेतला असता त्यांनी यावर अधिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक व्यक्तीची गुणसूत्रे वेगवेगळी असतात, मात्र त्यातही प्रदेश, वातावरण, वंश अशा काही गोष्टींचा कणमात्र का होईना एक भाग असतोच, भारतीयांमधील हा भाग या लढाईत कदाचित उपयोगी पडू शकतो, असा एक अंदाज यातून व्यक्त होताना दिसतो आहे.
पँथॉलाजिस्ट (एम.डी.) डॉ. मंदार परांजपे यासंबधी बोलताना म्हणाले, जगात सर्वत्र या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही तो पोहचलाच आहे. मानवी शरीरात रक्तामध्ये लाल व पांढºया पेशी असतात. त्यातील पांढºया पेशी बाहेरून शरीरात आलेल्या विषाणूंबरोबर लढण्याचे काम करतात. पांढºया पेशी लढत असताना कधीकधी त्यातून घातक असे सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होते. त्यात ‘आयएल६’हे एक प्रकारचे रसायन निर्माण होते. सायटोकाईन स्टॉर्म हे रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकते. सायकोकाईन स्टॉर्म निर्माण होण्याची संभाव्यता ही पांढर्या पेशीवर असलेल्या विशिष्ट ‘मून ल्यूकोसाईट अँन्टीजेन नुसार ठरते.
डॉ. परांजपे पुढे म्हणाले, भारतीयांच्या पांढºया पेशींवर जे विशिष्ट ‘मून ल्युकोसाईट अँन्टीजेन’ जास्त प्रमाणात आहेत, त्यांच्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मची संभाव्यता कमी होत असावी आणि त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा, असा एक आशावादी शास्त्रीय अंदाज व्यक्त होतो आहे. पण अजून हे संशोधनाद्वारे सिद्ध
झाले नसल्यामुळे आपण अजिबात गाफील राहून चालणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे.

भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती इतरांपेक्षा अधिक चांगली...
डॉ. अनंत फडके हेही वैद्यक क्षेत्रातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत. ते म्हणाले, ‘या मुद्यांवर चर्चा सुरू आहे हे बरोबर आहे, मात्र ती प्राथमिक स्तरावर आहे. हा विषाणू नवा आहे, त्याची लक्षणे नवी आहेत. भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती अन्य लोकसमूहांपेक्षा निश्चितच चांगली आहे.’
४पण या नव्या विषाणूच्या आजारासमोर ती कसा व किती टिकाव धरेल यावर अभ्यास व अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तसा अभ्यास व संशोधन सुरूही असेल किंवा आहे. त्यातून पुढे काही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झाले तरच यावर खात्रीपूर्वक बोलता येईल.

Web Title: CoronaVirus Will immunity power save Indians?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.