corornavirus : काेराेनाला राेखण्यासाठी पुणे महापालिकेचे स्वच्छता दूत करतायेत जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:20 PM2020-03-20T16:20:04+5:302020-03-20T16:21:30+5:30
काेराेनाबाबत विविध पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्यात आता पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थावन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
पुणे : काेराेनाचा प्रभाव राज्यभरात वाढत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत 52 नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यातही पुण्यातील काेराेना बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील काेथरुड भागातील घनकचरा विभागाचे कर्मचारी घराेघरी जाऊन काेराेनाबाबत जनजागृती करत आहेत. त्याचबराेबर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहेत.
पालिकेच्या प्रत्येक आराेग्य काेठी अंतर्गत एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे प्रत्येक साेसायटी, झाेपडपट्टी, बंगले यांमध्ये जाऊन काेराेनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानात नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, तसेच परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची माहिती देऊन त्यांची आरोग्य तपासणी महानगरपालिकेच्या आरोग्य तपासणी केंद्रातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, घसा दुखणे असे होत असेल तर त्वरित करोना व्हायरसची तपासणी करून घेण्यास सांगण्यात येत आहे. याशिवाय तोंडाला मास्क लावणे, आपले हात दिवसातून किमान दहा ते पंधरा वेळा निर्जंतुक साबणाने हात स्वच्छ धुणे, खोकतेवेळी तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा, थंड पदार्थ व शीतपेय सेवन करणे टाळा, पाणी उकळून प्या, अधिक संपर्क टाळा, असे सांगण्यात येत आहे. थुंकी सम्राटांवर गांधीगिरीतून गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात येत आहे.
काेथरुड परिसरात दोन दिवसात वीस हजार नागरिकांचे काेराेनाबाबत प्रबाेधन करण्यात आले. ही मोहीम करोनाची भिती आहे तोपर्यंत चालू राहील असे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांनी सांगितले. हे अभियान राबविण्यासाठी आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, वैभव घटकांबळे, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, सतीश बनसोडे, शिवाजी गायकवाड, महेश लकारे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक खुडे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी इत्यादींनी भाग घेतला.