महामंडळाने हिरडा खरेदी सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:25+5:302021-07-16T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : जिल्ह्याच्या उत्तर भागातील आदिवासी क्षेत्रात तयार होणारा हिरडा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी करणे बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : जिल्ह्याच्या उत्तर भागातील आदिवासी क्षेत्रात तयार होणारा हिरडा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी करणे बंद केल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरड्याचा हमीभाव निश्चित करून महामंडळाने हिरडा खरेदी सुरू करावी, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले.
आदिवासी भागासाठी काम करणारा एकात्मिक आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास महामंडळ यांच्याकडील हिरडा खरेदी, खावटी वाटप, शबरी आवास योजना, वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी, ठक्कर बाप्पा योजना अशा अनेक प्रश्नांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस समाज कल्याणचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, आंबेगाव पंचायत समिती सभापती संजय गवारी, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव सु.न.शिंदे, एल.के.डोके, उपसचिव रविंद्र औटी, सह आयुक्त विकास पानसरे, अप्पर आयुक्त गिरीष सरोदे, कार्यकारी संचालक नितीन पाटील, प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, विस्तार अधिकारी नवनाथ भवारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत घोडेगांव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या कामांना निधी पुरवणे तसेच प्रलंबित योजना तात्काळ राबवल्या जाव्यात, जुन्नर येथे सुरू होत असेल्या हिरडा प्रक्रीया कारखन्यास निधी दिला जावा. आदिवासी विकास विभागातील पर्यटन वाढावे यासाठी वनविभागा मार्फत प्रस्ताव तयार करावेत तसेच आदिवासी मुलांना पर्यटनातून रोजगार मिळावा यासाठी योजना तयार करावी अशा सुचना वळसे पाटील यांनी दिल्या.
तसेच सध्या शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे, मात्र आदिवासी भागात रहाणाऱ्या मुलांना यामध्ये अनेक अडचणी येतात यासाठी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने करावी. पडकई योजनेयासाठी आदिवासी विकास विभागाने जिल्हा नियोजन समितीमध्ये तरतुद करावी. घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कायमस्वरूपी प्रकल्प अधिकारी नेमावा. घोडेगाव येथील आदिवासी मुला मुलींच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणुक केली जावी. राजपुर येथे बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाची चौकशी करावी, शबरी आवास योजनेचा लक्षांक वाढून देण्यावा व याची प्रलंबीत बीले त्वरीत दिली जावीत या विषयांवर चर्चा होवून अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.
15072021-ॅँङ्म-ि04 - मुंबई येथे मंत्रालयात आयोजीत आदिवासी विभागाच्या बैठकीत बोलताना दिलीप वळसे पाटील व यावेळी उपस्थित अतुल बेनके, के.सी.पाडवी, सुनिल शेळके व इतर