महामंडळ वसतिगृहांची कामे त्वरित सुरू करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:42+5:302021-07-20T04:08:42+5:30
पुणे : ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ, वसतिगृहे, उसाच्या टनामागे १० रुपये अशा फक्त घोषणाच होत आहेत, त्याची कार्यवाही त्वरित होईल ...
पुणे : ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ, वसतिगृहे, उसाच्या टनामागे १० रुपये अशा फक्त घोषणाच होत आहेत, त्याची कार्यवाही त्वरित होईल यात लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेने केली.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड तसेच चंद्रशेखर पुरंदरे यासंदर्भात भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
राठोड म्हणाले, महामंडळाची घोषणा मागील सरकारच्या कार्यकाळात झाली, पण कार्यवाही शून्य. आता हेही सरकार घोषणाच करत आहे. मात्र त्यातील प्रत्यक्षात काहीच यायला तयार नाही. अशा घोषणांनी कामगारांच्या अपेक्षा उंचावतात व अखेर कोसळतात. गरीब ऊसतोडणी कामगारांचा हा एक प्रकारे मानसिक छळच आहे. त्यामुळे सर्व घोषणा सरकारने त्वरित अमलात आणाव्यात, ऊसतोडणी कामगारांच्या भावनांशी खेळू नये.