धार्मिक स्थळांविरोधातील पालिकेची कारवाई सुरू
By admin | Published: November 17, 2016 04:19 AM2016-11-17T04:19:25+5:302016-11-17T04:19:25+5:30
अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अखेर सुरू केली आहे.
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व त्याला अनुसरून राज्य सरकारने दिलेला आदेश यामुळे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अखेर सुरू केली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहराच्या उनगरांमधील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हलविण्यात आली. अशा कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी पालिकेकडून घेण्यात येत आहे.
सन २००९ नंतर बांधण्यात आलेली सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. त्यानंतर राज्य सरकारला त्याचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य ंसस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्याचे व त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचे पालन करण्यात अनेक अडथळे येत होते. मात्र अखेरीस पालिकेला कारवाई करावीच लागली.