महापालिकेच्या तिजोरीत पडले २१०० कोटी

By admin | Published: April 1, 2016 03:26 AM2016-04-01T03:26:43+5:302016-04-01T03:26:43+5:30

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग वगळता मिळकतकर, बांधकाम परवाना, एलबीटी, आकाशचिन्ह परवाना विभागांनी ३१ मार्च अखेर उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

The Corporation's corporeal damaged 2100 crores | महापालिकेच्या तिजोरीत पडले २१०० कोटी

महापालिकेच्या तिजोरीत पडले २१०० कोटी

Next

पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग वगळता मिळकतकर, बांधकाम परवाना, एलबीटी, आकाशचिन्ह परवाना विभागांनी ३१ मार्च अखेर उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सुमारे एकवीसशे कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीत पडली आहे. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने महापालिकेला अच्छे दिन आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एलबीटी हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत होते. मात्र, पन्नास कोटींची उलाढाल असणाऱ्या उद्योगांना एलबीटी लागू असल्याचा निर्णय सरकारने घेतल्याने महापालिकेचे उत्पन कमी होते की काय, अशी भीती महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनास होती. मात्र, एलबीटीसह अन्य विभागांनीही आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हटल्यानंतर विविध इन्कम टॅक्सबरोबरच पाणी, मिळकत, एलबीटी कर भरण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून येते. वर्षाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने महापालिकेने विविध करांचा भरणा करण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन केले होते. जोपर्यंत नागरिक येतील, तोपर्यंत भरणा करून घ्यावा, अशी सूचना कर्मचाऱ्यांना केली होती. त्यानुसार प्रभाग आणि क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांची कर भरण्यासाठी लगबग दिसून येत होती. तसेच आपल्या विभागाचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी अधिकारीही मुख्यालयातून आढावा घेत होते. मध्यरात्रीपर्यंत आढावा घेण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू होते.
पाणीपुरवठा विभाग मागे
मिळकतकर, बांधकाम, एलबीटी विभागाने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले असले, तरी पाणीपुरवठा विभाग मागे असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी ५२.१६६ कोटींपैकी ३९.९९ कोटींची वसुली झाली होती. या वर्षी ६६.७८ कोटींपैकी ३४.८३४ कोटींची वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)

एलबीटीतून १३०० कोटी
एलबीटीसाठी साडेबाराशे कोटींचे उद्दिष्ट होते. गेल्या वर्षी १०२१ कोटी उत्पन्न मिळाले होते. या वर्षी मार्चअखेर १३०० कोटी उत्पन्न मिळाले आहे. त्यात एलबीटीतून ७२३. ४१ कोटी, मुद्रांक शुल्कातून शंभर कोटी, शासन अनुदानातून साडेचारशे कोटी, एक्सकॉर्टमधून ५.७० कोटी असे १२९७ कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. भरण्यासाठी उशिरापर्यंत मुदत असल्याने उत्पन्नात आणखी वाढ होईल, तसेच या महिन्यातील मुद्रांक शुल्काची रक्कम जमा झालेली नाही. मुद्रांक शुल्काची सुमारे दहा कोटींची भर पडणार आहे, अशी माहिती एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.

बांधकाम परवाना विभाग ३३५ कोटी
बांधकाम परवाना विभागासाठी सुमारे तीनशे कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. औद्योगिक मंदीमुळे बांधकाम विभाग उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, मंदीतही उत्पन्नात भर पडली आहे. ३३५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

मिळकतकरातून ४०७ कोटी
मिळकतकर विभागासाठी ३९७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अनधिकृत बांधकामांची शास्ती यामुळे थकबाकीचा फुगवटा अधिक दिसून येत होता. तीन महिन्यांत वसुलीसाठी या विभागाने विशेष मोहीम राबविली. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करूनसायंकाळी सहापर्यंत ४०७ कोटींची वसुली केली आहे. करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त भानुदास गायकवाड यांनी दिली.

आकाशचिन्ह परवाना विभागाकडून ६.५० कोटी उत्पन्न
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून विविध परवानग्या, फलक यांतून सुमारे साडेसहा कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: The Corporation's corporeal damaged 2100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.