नगरसेवक दीपक मानकर पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 11:54 AM2018-08-01T11:54:51+5:302018-08-01T11:56:37+5:30

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर आज सकाळी पोलिसांना शरण आले.

Corporator Deepak Mankar surrender | नगरसेवक दीपक मानकर पोलिसांना शरण

नगरसेवक दीपक मानकर पोलिसांना शरण

googlenewsNext

पुणे - सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर आज सकाळी पोलिसांना शरण आले. न्यायालयाने जामीन फेटाळताना १० दिवसात पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज दीपक मानकर हे लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. समर्थ पोलीस ठाण्याजवळील एका जागेवरुन वादातून ही घटना घडली होती.

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर आत्महत्येला जबाबदार असल्याचे लिहिले होते. यावरुन मानकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक मानकर यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला़ त्यानंतर मानकर मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेथे ३ खंडपीठाने त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. तेथेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने १० दिवसांच्या आत पोलिसांसमारे हजर राहण्याचा आदेश दिला होता. शेवटी बुधवारी सकाळी ते लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांसमोर उपस्थित झाले असून, त्यांना रितसर अटक करुन न्यायालयात नेण्यात येणार आहे. 

Web Title: Corporator Deepak Mankar surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.