विकासकामांबद्दल नगरसेवकच अनभिज्ञ

By admin | Published: November 29, 2014 11:04 PM2014-11-29T23:04:44+5:302014-11-29T23:04:44+5:30

‘‘बारामती नगर पालिकेच्या कारभाराची माहिती खुद्द नगरसेवकांनाच नसते. बांधकाम सभापती असताना आपल्याला कोणत्याही निर्णयप्रक्रियेत बोलावले जात नाही.

Corporator is unaware of development works | विकासकामांबद्दल नगरसेवकच अनभिज्ञ

विकासकामांबद्दल नगरसेवकच अनभिज्ञ

Next
बारामती : ‘‘बारामती नगर पालिकेच्या कारभाराची माहिती खुद्द नगरसेवकांनाच नसते. बांधकाम सभापती असताना आपल्याला कोणत्याही निर्णयप्रक्रियेत बोलावले जात नाही. त्याचबरोबर ज्या रस्त्यांसाठी ठराव केला जातो, त्यामध्ये परस्पर बदल केले जातात. अन्य सभापतींचीदेखील हीच अवस्था आहे. एकाच स्वीकृत नगरसेवकाच्या इशा:यावर पालिकेचा कारभार केला जातो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीची कामे सुरू आहेत. पक्षनेत्यांचे आदेश असतील नगरसेवक मान्य करतील; मात्र आता नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे, तरच जनतेच्या प्रश्नांना उत्तर देता येईल,’’ अशा शब्दांत बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मागील तीन वर्षात होत असलेल्या घुसमटीला मोकळीक करून दिली.  
जवळपास चार महिन्यांनंतर बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे  नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केले होते. आजच्या सभेत महिला नगरसेवकांनी देखील त्यांची खंत उघडपणो बोलून दाखवली. कोटय़वधी रूपयांच्या योजना आहेत. त्यांची कामे सुरू आहेत. होणार आहेत, असे असताना त्याची माहिती नगरसेवकांनाच नसते. त्याच बरोबर विविध खात्यांच्या सभापतींना देखील विश्वासात घेतले जात नाही. नगरपालिकेची कामे सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण आदी शासकिय खात्यांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे त्या खात्यांचे अधिकारी काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागू देत नाही. त्यामुळे मागील 3 वर्षात वाढीव हद्दीसह आलेला निधी, त्यातून केलेला विकास कामांवरील खर्च, प्रस्तावित कामांची यादी सर्व नगरसेवकांना 15 दिवसात द्यावीत, अशी मागणी नगरसेवक योगेश जगताप यांनी केली. त्यानुसार कार्यवाही करावी, असे आदेश नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी दिले. 
मागील तीन वर्षात कोणत्याही विषयांवर चर्चाच न करणा:या नगरसेवकांनी देखील आज मौन सोडले होते. एका नगरसेवकाच्या मनमानी कारभारामुळे सर्वाना भोगायचे येईल, अशी भिती व्यक्त करण्यात आली. त्याच बरोबर नगरसेवक विक्रांत तांबे यांनी मागील सर्वसाधारण सभेत ज्या रस्त्यांची कामे सुचविली होती. त्यांना मंजूरी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात ते रस्ते वगळून दुस:याच रस्त्यांची कामे यादीत घेतली आहेत. हा बदल कोणी केला आहे. तसेच या विषयाला आपण अनुमोदन दिलेले नाही, तरी माङो नाव टाकले आहे, हे कसे होते. याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. नगरसेवक जय पाटील यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला. रस्त्यांचा विषयच बोगस आहे, तो रद्द करावा, अशी मागणी या नगरसेवकांनी केली.  ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले, शाम इंगळे, बापू बागल,  पौर्णिमा तावरे, गटनेत्या भारती मुथा, संजय लालबिगे, सुषमा हिंगणो, आरती शेंडगे या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह     विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी नगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. 
नगरसेवक योगेश जगताप यांनी आपण बांधकाम सभापती असताना आता र्पयत रस्ते, बांधकाम संदर्भात होणा:या निर्णयांच्या बाबतीत कोणीही बोलवत नाही. बोलावले नाही. परस्पर निर्णय घेतले जातात. सार्वजनिक बांधकाम खात्याचेअधिकारी हवेत असतात. ते नगरसेवकांना जुमानतच नाही. एकच स्विकृत नगरसेवक शासकिय खात्यांच्या अधिका:यांशी चर्चा करतो. त्यामुळे मनमानीपणा वाढला आहे. हा प्रकार थांबवून नगराध्यक्षांनी उर्वरित काळात नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली. तर बारामती नगरपालिका प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्या सारखे काहीजण वापरत आहेत. एका नाटय़गृहात ठेकेदार, अधिका:यांच्या बैठका होतात, त्यामुळे बारामती पालिकेचा गैर कारभार वाढला आहे, असा आरोप करून नगरसेवक सुनिल सस्ते यांनी या प्रकारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली. जयश्री सातव, वनीता बनकर, विक्रांत तांबे, राहूल वाघोलीकर, प्रशांत भोईटे यांनी देखील प्रशासनाला विविध प्रश्नी विचारणा केली. (प्रतिनिधी)
 
‘‘विविधकामांसाठी बारामतीत खोदकाम सुरू आहे. खोदकाम करताना जुन्या पाण्याच्या लाईन फुटल्यास नागरीक नगरसेवक म्हणून आमच्याकडे गा:हाणी मांडतात. काही महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यांना खड्डे पडतात. नगरसेवक म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची पूर्तता करू शकत नसेल, तर नगरसेवक म्हणून काम करायाला देखील लाज वाटते, ’’ अशा शब्दांत नगरसेविका पौर्णिमा तावरे यांनी नाराजी व्यक्त केली. आजच्या सभेला महिला नगरसेवकांची जास्त होती. त्यांच्या देखील अशाच प्रतिक्रिया होत्या. 

 

Web Title: Corporator is unaware of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.