नगरसेवक, अधिकाऱ्यांनी केली आयुक्तांची सरबराई

By admin | Published: May 3, 2016 03:37 AM2016-05-03T03:37:35+5:302016-05-03T03:37:35+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निरोपानिमित्त पार्टी दिली. वजनदार भेटवस्तू

Corporators, officials complained to the Commissioner | नगरसेवक, अधिकाऱ्यांनी केली आयुक्तांची सरबराई

नगरसेवक, अधिकाऱ्यांनी केली आयुक्तांची सरबराई

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निरोपानिमित्त पार्टी दिली. वजनदार भेटवस्तू देऊन आयुक्तांची सरबराई केली.
आयुक्त जाधव यांची नाशिक येथील आदिवासी विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतून जाधव यांची बदली होऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसे पत्रही पाठविले होते. मात्र, मंगळवारी नवे आयुक्त रुजू होणार असल्याने आयुक्त जाधव यांना सत्तारूढ पक्षाचे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी निरोप देण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. पिंपरीतील महापालिकेसमोरील पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्रदिनी ही पार्टी झाली. रात्री दहा ते बारा या वेळेत निरोप समारंभ झाला. या वेळी सत्तारूढ पक्षातील नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. या वेळी सुमारे अडीच लाखांची एक मूर्ती असलेली भेटवस्तू देण्यात आली. सत्तारूढ पक्षाबरोबरच विरोधी पक्षातील काही नगरसेवकही या समारंभास उपस्थित होते. (प्रतिनिधी)

- महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात अशाप्रकारची फाईव्ह स्टार पार्टी प्रथमच झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. ही पार्टी दोन ठेकेदारांच्या मदतीने दिल्याचीही चर्चाही रंगली होती.

Web Title: Corporators, officials complained to the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.