तांत्रिक चूक दुरुस्त, मेट्रोसाठी बालेवाडीतील ५ हेक्टर ‘टाटा सिमेन्स’ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:43+5:302021-05-13T04:11:43+5:30
पुणे : हिंजवडी मेट्रोचे काम घेतलेल्या टाटा सिमेन्स कंपनीला बालेवाडी येथील ५ हेक्टर जागा देण्यासंबधी मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी शिक्कामोर्तब ...
पुणे : हिंजवडी मेट्रोचे काम घेतलेल्या टाटा सिमेन्स कंपनीला बालेवाडी येथील ५ हेक्टर जागा देण्यासंबधी मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी शिक्कामोर्तब झाले.
मेट्रोच्या कामाच्या मूळ निविदेत ही जागा जी कंपनी काम घेईल त्यांना देण्याचे कलम होते. मात्र जागा चुकून पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नावावर लागली गेली. त्यात बदल करून जागा मेट्रोचे काम घेतलेल्या टाटा सिमेन्सच्या नावावर करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
हिंजवडी मेट्रोचे काम पीपीपी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) होते आहे. टाटा सिमेन्स कंपनीने या जागेचा व्यावसायिक वापर करून मेट्रो प्रकल्पासाठी पैसे उभे करणे अपेक्षित आहे.
‘‘ही तांत्रिक चूक झाली होती. मंत्रिमंडळाने ती दुरुस्त केली असून त्यातून आता पुढची प्रक्रिया सुलभ होईल,” असे ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.