भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:01 PM2021-05-26T21:01:30+5:302021-05-26T21:02:38+5:30

लष्करभरती घोटाळा प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य, भरती प्रक्रिया आणखी पारदर्शी बनविणार

Corrupt people have no place in Indian Army: Lieutenant General J.S.Nain | भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन 

भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन 

Next

पुणे : लष्करात भ्रष्ट लोकांना स्थान नाही. लष्करातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कडक उपाय योजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लष्कर भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात माहिती देऊन यातील आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात लष्कर पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. येत्या काळात लष्करभरती प्रक्रिया आणखी पारदर्शक बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सांगितले. 

लष्कराच्या जनरल ड्युटी भरती प्रक्रियेचा प्रश्नपत्रिका संच लष्करातील काहींनी फोडला होता. उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना लष्करात भरती करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र,या प्रकरणाची आम्हाला आधीच माहिती मिळाल्याने २८ फेब्रुवारीला याची माहिती पोलिसांना दिली असून या भ्रष्ट्राचाराला आम्ही वाचा फोडली होती. भारतीय  लष्कराला एक मान आहे, प्रतिष्ठा आहे. ही प्रतिमा जपण्यासाठी लष्करातील या भ्रष्ट प्रवृत्तीना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. भविष्यात या प्रकरणात पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य राहील. 

भारतीय लष्करात भरती होण्याची देशातील तरुणांची अतीव इच्छा असते. यामुळे त्या या प्रकारच्या प्रवृत्तीना ते बळी पडू नये यासाठी, भरतीप्रकिया अधिक पारदर्शी बनण्याचा आमचा मानस आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर आम्ही कठोर पावले उचलली आहेत. 

दक्षिण मुख्यालयातंर्गत येणाऱ्या प्रत्येक लष्करी ठाण्यांना या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी भविष्यात असल्या प्रवृत्तीना बळी पडू नये, असे आवाहन जनरल नैन यांनी करत ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
------
.

Web Title: Corrupt people have no place in Indian Army: Lieutenant General J.S.Nain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.