सरकारच्या भ्रष्टाचाराने राज्यात कोव्हिडं रुग्ण वाढले, स्वतः बेजबाबदार राहून लोकांना जबाबदारी शिकवू नये. किरीट सोमैयांचा सरकारवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:21 PM2021-03-15T18:21:31+5:302021-03-15T18:28:04+5:30
भाजपा नेते किरीट सोमैया यांची राज्य सरकारवर टीका
स्वतःच , स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राज्यात कोविडचे रुग्ण वाढले आहेत. अशी टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी राज्य सरकारवर केली आहे. सरकारवर निशाणा साधत कोविड रुग्ण कसे वाढतात हे मंत्रालयात आणि मातोश्रीत बसून कळणार नाही. सरकारने स्वतः बेजबाबदार राहून लोकांना जबाबदारी शिकवू नये. असे ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात ते लसीकरण केंद्रास भेट द्यायला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
सोमैया म्हणाले देशाच्या दोन तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात कोविड वाढण्याची भीती वाटत आहे.
लसीकरण पूर्ण होयला वर्ष लागणार आहे. तोवर काळजी घेण्याची गरज आहे. परत रेमडेसिव्हीरचा काळा बाजार होऊ शकतो. आज मुंबई पुण्यात आयसीयू बेड नाहीत, नियोजन करण्याची गरज आहे. मास्क वापरलं नाही तर किरीट सोमैय्यावर ही कारवाई व्हावी. लोकांची जबाबदारी सरकार आठवण करून देतंय आणि स्वतः बेजबाबदार वागत आहेत.