कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आणखी दोघांना मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:15 AM2018-09-15T00:15:44+5:302018-09-15T00:16:08+5:30

कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे.

Cosmos Bank Cyber ​​Durda case: Two more arrested from Mumbai | कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आणखी दोघांना मुंबईतून अटक

कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आणखी दोघांना मुंबईतून अटक

Next

पुणे : कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अर्पामेंट, नारंगी रस्ता, विरार, मूळ कुलीना टुकुरा, जि. बरगर, ओडिशा) आणि मोहंमद सईद इक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (वय ३०, रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. त्यामुळे आता एकूण अटक आरोपींची संस्था ६ झाली आहे.
यापूर्वी शेख मोहंमद अब्दुल जब्बार (वय २८, मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, धावरीतांडा, नांदेड), फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर, आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जब्बार आणि रोठोड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराणा आणि जाफरी यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची छायाचित्रे तयार
करण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरून ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. चैत्राली पणशीकर यांनी केली होती.

कोल्हापुरात एकत्र आले आरोपी
बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने विविध भागांतील सर्व आरोपी कोल्हापूर येथे आले. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटूल्याची घटना ११ ते १३ आॅगस्टदरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रांतून काढण्यात आली आहेत. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत.

Web Title: Cosmos Bank Cyber ​​Durda case: Two more arrested from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.