कष्टाची किंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:18+5:302021-07-02T04:08:18+5:30
बक्षिसासाठी अधीर झालेल्या आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेत वडील म्हणाले, ‘तुझे १३-१४ वर्षांचे संस्कारक्षम वय आहे. या वयात फुकटची ...
बक्षिसासाठी अधीर झालेल्या आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेत वडील म्हणाले, ‘तुझे १३-१४ वर्षांचे संस्कारक्षम वय आहे. या वयात फुकटची मोटारगाडी मिळावी, ही लालसा कशासाठी? हरामाच्या कमाईची सवय पडली, की मग कष्टाच्या कमाईत भागत नाही, समाधान होत नाही. परिश्रमांवाचून प्राप्त होते ती हराम की कमाई.’ वडिलांचे, म्हणजेच म. गांधींचे अनुयायी असलेले आचार्य दादा धर्माधिकारी यांचे हे वाक्य त्याच्या म्हणजेच भविष्यात न्यायाधीशपदापर्यंत पोचलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हृदयावर इतके कोरले गेले की, लहान वयात हार-जीत पद्धतीने गोट्या खेळणे असो, पत्ते असोत वा मोठे झाल्यावर सरकारी लॉटरी खरेदी करण्याची वा रेसकोर्सवर जाऊन घोड्यांवर पैसे लावण्याची खास व्यवस्था असूनही श्रम न करता फुकटची कमाई करावी, असे चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मनातही कधी आले नाही. एकावर एक ‘फ्री’ची अपेक्षा असणाऱ्या आजच्या काळात अशी संस्कारमूल्य रुजविण्याचे प्रयत्न सर्वांनीच केले पाहिजेत,नाही का !
- प्रसाद भडसावळे
--
फोटो ०१ टी ग्रामीण दादा धर्माधिकारी
--
फोटो क्रमांक : टी ग्रामीण ०१कॅम्पस दादा धर्माधिकारी