स्वाइन फ्लू लसखरेदीसाठी पावणेनऊ लाखांचा खर्च

By admin | Published: January 4, 2016 12:58 AM2016-01-04T00:58:41+5:302016-01-04T00:58:41+5:30

महापालिका स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस खरेदी करणार असून, यासाठी पावणेनऊ लाखांचा खर्च येणार आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे

Cost of new lacs for swine flu vaccination | स्वाइन फ्लू लसखरेदीसाठी पावणेनऊ लाखांचा खर्च

स्वाइन फ्लू लसखरेदीसाठी पावणेनऊ लाखांचा खर्च

Next

पिंपरी : महापालिका स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस खरेदी करणार असून, यासाठी पावणेनऊ लाखांचा खर्च येणार आहे.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गरोदर माता, रुग्ण यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस देण्यासाठी लसची आवश्यकता भासत आहे. या लसीचे तीन हजार डोस खरेदी करण्यासाठी आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे.
दरम्यान, सद्य:स्थितीत एक हजार डोस खरेदी करण्यात आले असून, त्यासाठी दोन लाख ९२ हजार ९५० रुपयांचा खर्च आला आहे.
यासह उर्वरित दोन हजार डोस गरजेनुसार खरेदी करण्यात येतील. अशाप्रकारे तीन हजार डोस खरेदीसाठी येणाऱ्या ८ लाख ७८ हजार ८५० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cost of new lacs for swine flu vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.