कोथिंबीर, मेथी बाजारातून गायब
By admin | Published: May 28, 2015 11:20 PM2015-05-28T23:20:37+5:302015-05-28T23:20:37+5:30
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीला अनुक्रमे शेकडा ४००० ते ५००० रुपये आणि शेकडा २५०० ते ३००० रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळत आहे़
निरगुडसर : सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीला अनुक्रमे शेकडा ४००० ते ५००० रुपये आणि शेकडा २५०० ते ३००० रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळत आहे़ त्यामुळे शेतकरी स्थानिक आठवडे बाजारात शेतमाल विकण्याऐवजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत़ किरकोळ विक्रीपेक्षा बाजार समितीत एकरकमी पैसे मिळत आहेत़ परंतु, यामुळे आठवडे बाजारातून कोथिंबीर, मेथी गायबच झाली आहे़
कमी कालावधीत मिळणारी पिके म्हणून याकडे पाहिले जाते़ मेथी २१ दिवसांत, कोथिंबीर ४५ दिवसांत तयार होते़ त्यामुळे उन्हाळी हंगामात हमखास आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो़ परंतु, पाणीटंचाई आणि कडक उन्हामुळे मरतुकीचे प्रमाण वाढत आहे़ शेतकऱ्यांकडून मागणीइतका पुरवठा होत नसल्यामुळे भाव वाढल्याचे स्थानिक व्यापारी सीताराम चासकर, विकास वाघमारे, राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
४कडक उन्हामुळे कोथिंबीर आणि मेथी पिकाची उगवण चांगली होऊनदेखील पहिल्या आठवड्यात मरतुकीचे प्रमाण वाढते़
४शेतकऱ्यांनी घेतलेल्या एकूण उत्पादनापैकी ४० ते ५० टक्के उत्पन्न विक्रीसाठी बाजार समितीत पोहोचते़ त्यामुळे एकूणच बाजारात मालाची आवक कमी होते़
४सध्या लग्नसराई, सत्यनारायणाची महापूजा, वास्तुशांती आदी कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे
रोजच्या आहारामध्ये महत्त्वाचा भाजीपाला म्हणून कोथिंबीर आणि मेथीकडे पाहिले जाते़
४त्यामुळे या भाजीपाल्याची मागणी बाजारपेठेत वाढली आहे.