Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:04 IST2023-05-17T16:04:02+5:302023-05-17T16:04:46+5:30
खासदार सुप्रिया सुळे अकार्यक्षम असल्यामुळे आणि त्यांनी लक्ष न दिल्यामुळे खडकवासला सारख्या घटना घडतात

Video: तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका
पुणे : खासदार सुप्रिया सुळे अकार्यक्षम असल्यामुळे आणि त्यांनी लक्ष न दिल्यामुळे खडकवासला सारख्या घटना घडतात, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे. गेल्या १३ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे काय करतायेत जिथे हजारो पर्यटक फिरायला येतात तो सुधारता आला नाही का असा प्रश्न देसाई यांनी सुळे यांना विचारला आहे.
पुण्यातील खडकवासला बॅकवॉटरमध्ये कपडे धुवायला गेलेल्या ९ मुलींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. पाय घसरून पाण्यात पडलेल्या दाेघींना वाचवायला गेलेल्या दोघींना आपला जीव गमावावा लागला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १५) सकाळी खडकवासला बॅकवॉटरमध्ये घडली. बुलढाणा जिल्ह्यातून एका नातेवाइकाच्या कार्यक्रमासाठी या मुली आल्या होत्या. मुलींचा नातेवाईक संजय लहाणे हे धरणाच्या काठी असलेल्या गोऱ्हे खुर्द गावात काम करतात. त्यांची झोपडी पाण्यापासून जवळच आहे. तिथे त्या मुली व काही महिला आल्या होत्या. कपडे धुवायचे म्हणून मुली पाण्याकडे गेल्या होत्या. ही घटना सुप्रिया सुळेंच्या मतदार संघात घडल्याने देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
तेरा वर्षात सुप्रिया सुळेंना ते सुधारता आलं नाही का? खडकवासला घटनेवरून तृप्ती देसाईंची टीका#Pune#supriyasule#truptidesaipic.twitter.com/3fUM4Bpv9F
— Lokmat (@lokmat) May 17, 2023
सुप्रिया सुळे सक्षम नसल्याचा दावा
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येईल ,असे वाटले होते .मात्र त्या तेथे सक्षम ठरल्या नसल्याचे सांगून त्या बारामती मतदार संघातही सक्षम नसल्याचा टोला यावेळी देसाई यांनी लगावला होता.
...तर बारामतीत इतिहास घडवू शकते
बारामती लोकसभा मतदार संघात जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात करणार आहे. मात्र बारामती जिंकायची असेल, भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिल्यास बारामतीत इतिहास घडवू शकते ,असंही देसाई म्हणाल्या होत्या.