चिंबळी येथे रिंगरोडसाठी मोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:57+5:302021-07-03T04:07:57+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. त्यानुसार चिंबळी येथील शेतकऱ्यांना ...
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. त्यानुसार चिंबळी येथील शेतकऱ्यांना मोजणीची नोटीस चार दिवस आधी देण्यात आली होती. त्यानुसार मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. चिंबळीमध्ये शेतकऱ्यांची एकूण २५ हेक्टर, ५० गटांतून जाणाऱ्या रिंगरोडची मोजणी करण्यात येणार आहे. या जमीन मोजणीमध्ये रस्त्याचे क्षेत्र, जमिनीतील विहीर, कूपनलिका, घरे, फळझाडे, गोठा आदींची तपशीलवार नोंद, मार्किंग करण्यात आली. या वेळी खेडचे प्रांत अधिकारी विक्रम चव्हाण, आळंदी मंडल अधिकारी चेतनकुमार चासकर, तलाठी बी. बी. पाटील, भूमी अभीलेख एल. माळी, एमएसआरडीसीचे प्रतिनिधी वनारसे, कृषी विभाग, बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण विभाग अधिकारी आणि जमीन मालक, शेतकरी उपस्थित होते.