पुण्याच्या बहुप्रतीक्षित रिंगरोडची मोजणी ऑगस्टमध्ये पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:51+5:302021-07-28T04:11:51+5:30

जिल्हाकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी मंगळवार (दि. 27) रोजी रिंगरोडची आढाव बैठक घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्याच्या बहुप्रतीक्षित ...

The counting of Pune's much awaited ring road will be completed in August | पुण्याच्या बहुप्रतीक्षित रिंगरोडची मोजणी ऑगस्टमध्ये पूर्ण होणार

पुण्याच्या बहुप्रतीक्षित रिंगरोडची मोजणी ऑगस्टमध्ये पूर्ण होणार

googlenewsNext

जिल्हाकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी मंगळवार (दि. 27) रोजी रिंगरोडची आढाव बैठक घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्याच्या बहुप्रतीक्षित रिंगरोडसाठी अवघ्या तीन महिन्यांत मोजणीचे काम पूर्ण करण्याचा नवा विक्रम नावावर नोंदविला जाणार आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता. भोर) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांतून जाणार आहे. पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे.

चार तालुक्यांतील ३७ गावांतून हा रिंगरोड जाणार आहे. त्यापैकी ३२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या महिन्याअखेरपर्यंत १०० टक्के मोजणी पूर्ण करणार आहे.

आतापर्यंत सुमारे ३२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. ३१ जुलैपर्यंत उर्वरित गावांचे मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर भूसंपादन करावयाच्या जागेचे मूल्यांकन निश्‍चित करणार आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Web Title: The counting of Pune's much awaited ring road will be completed in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.