रांजेत शेतकऱ्यांचा विरोध मोडून रिंगरोडसाठी मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:09+5:302021-06-10T04:09:09+5:30

खेड शिवापूर :पुणे शहरालगतच्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोडच्या भूमापनाच्या प्रक्रियेला महसूल विभागामार्फत आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली याचाच ...

Counting for ring road by breaking the opposition of farmers in Ranjet | रांजेत शेतकऱ्यांचा विरोध मोडून रिंगरोडसाठी मोजणी

रांजेत शेतकऱ्यांचा विरोध मोडून रिंगरोडसाठी मोजणी

Next

खेड शिवापूर :पुणे शहरालगतच्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोडच्या भूमापनाच्या प्रक्रियेला महसूल विभागामार्फत आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली याचाच एक भाग म्हणून रांजे (ता.भोर) या गावात रिंगरोडसाठी महसूल विभागाने जागेची मोजणी सुरू केली आहे, मात्र या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने सदरची मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरू केली गेली.

रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी रिंगरोडविरोधात शासनाला हरकती नोंदवल्या होत्या. गावामध्ये दोन ते तीन वेळा महसूल विभागाच्या शेतकऱ्यांसोबत मीटिंग झाल्या होत्या, त्याचबरोबर संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्र्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय पुढली कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही अशा प्रकारचे आश्वासनही शेतकऱ्यांना दिले होते. मात्र हरकतींचे योग्य उत्तर न देताच संबधित प्रशासनाने मोजणी सुरू केली, त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन विरोध केला होता तो विरोध प्रशासनाने पोलिसान करवी मोडून काढला वडिलोपर्जित असलेली जागा, त्या जागेवर पोट भरणारे शेतकरी, आपण भूमिहीन होऊ आमची सुपीक जमीन घेऊ नका रिंगरोड डोंगराच्या बाजूने माळरानावरून न्या अशी भूमिका मांडत होते. मात्र, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ताब्यात घेतले.

शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करतंय- ज्या नोटिसा आम्हाला आल्या होत्या, त्या नोटिसांना कायदेशीर उत्तरे दिली होती. सुनावणीवेळी हरकती दिल्या, मात्र त्या हरकतींना प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. अशी भूमिका स्थानिक मांडताना दिसले.

मात्र महसूल विभागाचे वतीने गावामध्ये दोन ते तीन वेळा मीटिंग झाल्या होत्या.शिवाय शेतकऱ्यांना मोजणीच्या पूर्व सूचना दिल्या होत्या. नदी व विहिरींना कोणताही धक्का न लावता सदर रिंगरोड होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन सहकार्य करावे, असे भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

शासन करत असलेल्या शोषणाचे विरोधात पुढे मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारले जाईल. आमचा रिंगरोडला विरोध नाही तर प्रस्तावित रिंगरोड हा बहुतांश सुपीक जमिनीवर होत आहे, याला विरोध आहे. रिंगरोड माळरानावरवरून करावा.

स्थानिक शेतकरी

योगेश मांगले

मोजणीसाठी आलेले महसूलचे अधिकारी पोलीस व शेतकरी

Web Title: Counting for ring road by breaking the opposition of farmers in Ranjet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.