शहरात १४ ठिकाणी होणार मतमोजणी
By admin | Published: February 18, 2017 03:43 AM2017-02-18T03:43:59+5:302017-02-18T03:43:59+5:30
महापालिका निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान होत असून मतमोजणी गुरुवारी २३ फेब्रुवारीला होणार आहे. शहरातील ४१ प्रभागातील
पुणे : महापालिका निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान होत असून मतमोजणी गुरुवारी २३ फेब्रुवारीला होणार आहे. शहरातील ४१ प्रभागातील १६२ जागांसाठीची मतमोजणी शहरातील विविध १४ ठिकाणी होणार आहे़ दरवर्षी क्षेत्रीय कार्यालयात होणारी ही मतमोजणीची ठिकाणे यंदा बदलण्यात आली असून
महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदानास मंगळवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत
सुरु रहाणार आहे. मंगळवारी नागरिकांनी इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) उमेदवारांना दिलेला कौल बुधवारी जाहीर
होणार आहे.
शहरातील १४ ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून ती ठिकाणे प्रशासनाने निश्चित केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिष कुलकर्णी यांनी सांगितले. शहरातील ४१ प्रभागांची विभागणी १४ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत केली आहे. त्या १४ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले असनू तेथेच छाननी, अर्ज माघारी, चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली आहे. आता मजमोजणीची प्रक्रिया वेगळ्याच १४ ठिकाणी पार
पडणार आहे.
(प्रतिनिधी)