देशाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने : कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:16 AM2021-02-21T04:16:09+5:302021-02-21T04:16:09+5:30

येथील अनंतराव थोपटे महाविद्यालय फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, मंगलताई जगताप विद्यालय उंब्रज अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा पुणे ...

The country is moving towards a dictatorship: Kottapalle | देशाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने : कोत्तापल्ले

देशाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने : कोत्तापल्ले

googlenewsNext

येथील अनंतराव थोपटे महाविद्यालय फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, मंगलताई जगताप विद्यालय उंब्रज अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा पुणे यांनी आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि सामाजिक न्याय या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ. कोत्तापल्ले बोलत होते.

या वेळी डॉ. विजय खरे, डॉ. जावडेकर, डॉ. रोहिदास जाधव व नागरिक उपस्थित होते.

फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ. रोहिदास जाधव यांनी चर्चा सत्राच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली.

डॉ. कोतापल्ली म्हणाले की, सरकारने नागरिकत्व, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कृषी कायदे करताना त्यामधील धोरण स्पष्ट केले नाहीत. मुंगेरीलाल के हसीन सपने अशी त्यांची गत आहे. सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करण्याची वाटचाल सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हेतू स्पष्ट नाही. बहुसंख्य लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे हे धोरण आहे. एकत्र येऊन त्याला विरोध करायला हवा.

डॉ. खरे म्हणाले की, शैक्षणिक धोरणातील घोषणा फसव्या आहेत. वंचित वर्गाला डोळ्यांसमोर न ठेवता धर्माची जोड देऊन पारंपरिक पद्धतीने ते आपलेच आहे, त्यातील काही तरतुदी चांगल्या आहेत. डाॅ. जावडेकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घटनाविरोधी आहे, त्यामुळे अनेक महाविद्यालये बंद पडतील असेही ते म्हणाले.

Web Title: The country is moving towards a dictatorship: Kottapalle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.